शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्यातून दररोजचा प्रवास;मेटपिलावरेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात;पुलाच्या उभारणीची ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:55 IST

- हा प्रवास मुलांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. कैलास जोरकर यांनी आपल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी वेल्हे येथे भाड्याने खोली घेऊन व्यवस्था केली आहे

वेल्हे ( पुणे जि. ) - राजगड तालुक्यातील किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या मेटपिलावरे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील जोरकर वस्तीतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा वाजेघर तसेच माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी जातात. मात्र पावसाळ्यात शाळेकडे जाणारा मार्ग धोकादायक ठरत असून वाटेत येणाऱ्या ओढ्यातून पूर आलेले पाणी पार करून जावे लागते.

दररोज सकाळ-संध्याकाळ पालक मुलांना सुरक्षितपणे ओढा पार करून देतात. तरीदेखील हा प्रवास मुलांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. कैलास जोरकर यांनी आपल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी वेल्हे येथे भाड्याने खोली घेऊन व्यवस्था केली आहे, मात्र सर्वांना ते शक्य होत नाही.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७९  वर्षे उलटली तरी आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. जोरकर वस्तीसाठी पक्क्या रस्त्याची सोय नसल्यामुळे फक्त विद्यार्थीच नव्हे तर कामगार, शेतकरी, वृद्ध, अपंग आणि आजारी रुग्णांनाही याच ओढ्यातील पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही या ओढ्यावर पूल उभारण्याचे काम झालेले नाही. त्यामुळे तातडीने पुलाची उभारणी करून गावकऱ्यांना सुरक्षित दळणवळणाची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस