शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरंदर’साठी पाच दिवसांत ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण, मोजणी पथकाची संख्या वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:49 IST

​​​​​​​पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ उभारण्यात येणार

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी मोजणीचे काम २६ सप्टेंबरपासून सुरू असून, गेल्या पाच दिवसांत ३२१ हेक्टर अर्थात ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. जमीन मोजणीपूर्वी ३,२२० जणांनी २,८१० एकर जमिनीची, म्हणजेच सुमारे ९३ टक्के शेतकऱ्यांनी, संपादनासाठी संमतिपत्रे दिली आहेत. त्यानंतर आता प्रत्यक्ष जमीन मोजणीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यासाठी ड्रोनचा वापर केला जात असून, प्रत्यक्ष मोजणीसुद्धा केली जात आहे. पहिल्या पाच दिवसांतच ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे.जमीन मोजणीसाठी सुरुवातीला पाच पथके तयार करण्यात आली होती. आता त्यात आणखी एक पथक वाढविण्यात आले असून, सहा पथकांच्या माध्यमातून मोजणी केली जात आहे. मोजणीसाठी महसूल, वन, सार्वजनिक बांधकाम, कृषी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरंदर उपसा सिंचन आणि इतर शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. ही मोजणी शांततेत पार पडत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिली गेली आहे. मोजणीदरम्यान फळझाडे, शेतविहीर, पाइपलाइन आदींचे मूल्यांकन देखील करण्यात येत आहे. पुढील २० दिवस मोजणीचे काम सुरू राहणार आहे.मोजणीवेळी उपस्थित राहावे

स्थानिक शेतकरी, तसेच बाहेरगावी राहणाऱ्या शेतकऱ्यांनी मोजणीच्या वेळी उपस्थित राहावे. त्यांच्या जमिनीत असणाऱ्या फळझाडांसह मालमत्तेची माहिती द्यावी, जेणेकरून मोजणीत अचूकता आणि पारदर्शकता राहील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Purandar Airport Land Survey: 802 Acres Measured in Five Days

Web Summary : Land measurement for Purandar Airport's land acquisition is underway. 802 acres have been measured in five days. Farmers' cooperation is requested for accurate valuation. Six teams are working to complete the survey in 20 days.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAirportविमानतळ