शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या कच-यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करा - नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:29 IST

उरूळी देवाची कचरा डेपोला पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली भेट; पालिका कचरा प्रक्रिया क्षमता वाढविणार

पुणे :पुणे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम व शाश्वत करण्यासाठी अजून नवे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात महापालिकेची कचरा प्रक्रिया क्षमता वाढविण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. लिगसी वेस्ट (जुना कचरा) यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग किंवा बायो-रिमेडियेशन प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.उरुळी देवाची कचरा डेपोला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज भेट देउन कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख संदिप कदम, कार्यकारी अभियंता प्रसाद जगताप , अमर मदिकुंट आदी उपस्थित होते. पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्प, ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. 

हडपसर आणि घोले रोड येथील कचरा हस्तांतरण केंद्र यांचे आधुनिकीकरण करणे, घरोघरी जाऊन वाहनांद्वारे कचरा गोळा करणे कामी आधुनिक यंत्रणा निर्माण करणे, स्मार्ट कलेक्शन केंद्र निर्माण करणे, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे कामकाज गतीने पूर्ण करणे बाबतचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. पुणे महापालिका पर्यावरणीय दृष्टीने शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ आणि हरित पुण्याच्या दिशेने पुढील पाऊले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले. लोकोपयोगी प्रकल्पासाठी ती जागा वापरणारलिगसी वेस्ट (जुना कचरा) यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग किंवा बायो-रिमेडियेशन प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करावी. रिकामी करण्यात आलेली जागा लोकोपयोगी प्रकल्प अथवा विकास योजनांसाठी वापरणे शक्य होईल असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Complete Old Waste Bioremediation in One Year: Naval Kishore Ram

Web Summary : Pune Municipal Corporation aims to enhance waste management by increasing processing capacity. Commissioner Naval Kishore Ram directed the completion of legacy waste bioremediation within a year, freeing up land for public projects. Modernization of waste transfer stations and efficient collection systems are also prioritized for a cleaner Pune.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड