शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये मृतदेह गायब? नातेवाइकांचा गंभीर आरोप; प्रशासनाकडून मात्र सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:02 IST

रुग्णालयातून मृतदेह गायब झाल्याचा दावा; रुबी प्रशासनाकडून मात्र सारवासारव 

पुणे : प्रशिक्षणार्थी डॉक्टरची आत्महत्या, किडनी रॅकेट, प्रयोगशाळा सहायकाची आत्महत्या अशा एक ना अनेक प्रकरणांमुळे वादात राहिलेल्या रुबी हॉल हॉस्पिटलमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात मृत्यू झालेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह गायब झाल्याचा दावा नातेवाइकांनी मंगळवारी (दि. २०) केला.

अकलूज येथील स्मिता भगत या महिला रुग्ण रविवारी (दि. १८) रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (दि. १९) रात्री १०:००च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाइक हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधत होते. परंतु, त्यांचा मृतदेह देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मंगळवारी स्मिता भगत यांचा मृतदेह एका दुसऱ्याच रुग्णवाहिकेतून नातेवाइकांसमोर बाहेरून आणण्यात आल्याने नातेवाइकांनी आक्षेप घेऊन हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत नातेवाइक कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यासाठी गेले असता अद्याप गुन्हा नोंद होऊ शकला नाही.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून सुरुवातीला असा कोणताच प्रकार घडला नसल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, नातेवाइकांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतल्याने रुग्णालय प्रशासनाने सारवासारव करत ससून रोड येथील कोल्ड स्टोरेज दुरुस्तीच्या कामामुळे संबंधित मृतदेह तात्पुरत्या स्वरुपात रुबी हॉल, वानवडी येथे हलविण्यात आला होता. हा मृतदेह पोलिसांच्या समक्ष नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचे कळविले आहे.

मृत महिलेच्या मुलाचे मित्र निखिल पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला रुग्णाला निमोनियाचा त्रास व प्लेटलेट कमी झाल्याने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले हाते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटल येथे रविवारी (दि. १८) पाठविण्यात आले. सोमवारी (दि. १९) रात्री १०:००च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले. त्यावेळी रुग्णाचे भाचे व इतर नातेवाइकांनी रात्रीच्या वेळी दूरवर असलेल्या माळशिरस तालुक्यातील मूळ गावात मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याने शवागारात मृतदेह ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मंगळवारी (दि. २०) मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली असता, गेट पाससाठी मृतदेह थांबविण्यात आला.  

अनेक प्रयत्नांनंतर दुपारी ३:०० पर्यंत त्यांना गेट पास मिळाला नाही. मोठ्या आवाजात जाब विचारल्यानंतर दुपारी ४:०० वा. सुरक्षा विभागाच्या प्रमुखाने बाहेरून आलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिकेत मृतदेह असल्याचे सांगून, तो पाेलिसांसमोर ताब्यात घेण्यास भाग पाडले. मृतदेहाची अवस्था पाहता तो बराच काळ शवागाराबाहेर असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, पोलिसांनी दोन दिवसात तपास करून गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही करू, असे सांगितल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. 

रुबी हॉल क्लिनिक, ससून रोड येथून मृतदेह बेपत्ता झाल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. ससून रोड येथील कोल्ड स्टोरेज दुरुस्तीच्या कामामुळे संबंधित मृतदेह तात्पुरत्या स्वरुपात रुबी हॉल, वानवडी येथे हलविण्यात आला होता. सदर मृतदेह मंगळवारी (दि. २०) नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असून, यावेळी पोलिस प्रशासनही उपस्थित होते. मृतदेह सुपूर्द करण्यास झालेल्या विलंबामुळेच गैरसमज निर्माण झाला.  - अली दारुवाला, सल्लागार, रुबी हॉल क्लिनिक

English
हिंदी सारांश
Web Title : Ruby Hall Hospital: Body vanishes, family alleges negligence, hospital denies.

Web Summary : Family accuses Ruby Hall of losing a deceased woman's body. Hospital initially denied, then claimed relocation due to repairs. Police investigation underway into the alleged negligence.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र