पुणे : राहुल गांधी जे आरोप निवडणूक आयोगावर करत आहेत, त्यात मनोरंजनाशिवाय दुसरे काहीही नाही, त्यांनी बहुधा सलीम जावेद यांच्याकडून एखादी स्क्रिप्ट घेतली असावी, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आयोगाकडून मतांची चोरी या आरोपाची खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी दिल्लीच्या बैठकीतील हजेरीवरून टीका केली.मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी दिवसभर पुण्यात होते. वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती होती. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी राहुल गांधी निवडणूक आयोगावर करत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ते बोलत असलेल्या सर्व गोष्टी कपोलकल्पित आहेत. सगळ्यांचे त्यातून मनोरंजन होत आहे. सलीम जावेद यांची एखादी स्क्रिप्ट त्यांनी घेतली असावी. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया वगैरेविषयी विस्तृत माहिती देण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र राहुल गांधी त्यासाठी नकार देत आहेत, त्यांना ते मान्य नाही. हरण्याचे काहीतरी कारण लागते, ते त्यांनी शोधून काढले आहे व तेच सर्वांन सांगत फिरत आहेत.
राहुल गांधींच्या आरोपामागे सलीम-जावेदची स्क्रिप्ट ? फडणवीसांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:10 IST