पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बदल केला आहे. काही प्रशासकीय कारणांमुळे ३ मार्च २०२६ रोजी होणारे पेपर पुढे ढकलले आहे. सुधारित तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. ‘सीबीएसई’ने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
सुधारित वेळापत्रकानुसार दहावीची तीन मार्चला होणारी परीक्षा आता ११ मार्चला, तर बारावीची १० एप्रिलला होईल. या दोन परीक्षांव्यतिरिक्त इतर सर्व विषयांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत.
‘सीबीएसई’ने सर्व संलग्न शाळांच्या मुख्याध्यापकांना ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत तातडीने पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी केले आहे.
Web Summary : CBSE has revised the dates for the Class 10 and 12 exams, citing administrative reasons. The Class 10 exam scheduled for March 3rd will now be held on March 11th. The Class 12 exam originally scheduled will take place on April 10th. Other exams remain as scheduled.
Web Summary : सीबीएसई ने प्रशासनिक कारणों का हवाला देते हुए 10वीं और 12वीं की परीक्षाओं की तारीखों में संशोधन किया है। 3 मार्च को होने वाली 10वीं की परीक्षा अब 11 मार्च को होगी। 12वीं की परीक्षा जो पहले निर्धारित थी, 10 अप्रैल को होगी। अन्य परीक्षाएं पूर्व निर्धारित कार्यक्रम के अनुसार ही होंगी।