शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Pune news : केबलचे जाळे बेततेय पुणेकरांच्या जिवावर; नियमांना बगल देत कंपन्यांचा पालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:34 IST

कारवाईची जबाबदारी नेमकी कुणाची? यावरच अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

संजय चिंचोले/ सौरभ माने 

पुणे : शहरात बेवारस, लोंबकळणाऱ्या व धोकादायक केबल्समुळे वारंवार होणारे अपघात ही एक गंभीर समस्या बनली आहे. यात नागरिकांचे बळी जात असतानाही महापालिका प्रशासनाकडून या अनधिकृत केबल्सवर कारवाई केली जात नाही. कारवाईची जबाबदारी नेमकी कुणाची? यावरच अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. संपूर्ण शहरात हे जीवघेणे जाळे पसरलेले आहे. केबल कंपन्या नियमांना बगल देत विनापरवाना ओव्हरहेड केबलचे जाळे विणतात, यातून त्यांची कोट्यवधींची बचत होते. महापालिकेचा महसूल बुडत असताना प्रशासनातील काही अधिकाऱ्याचा त्यांंना छुपा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे.

रस्ते, फुटपाथ, झाडे आणि विजेच्या खांबावर लोंबकळणाऱ्या केबल्समुळे पुण्यातील वाहनधारक आणि पादचाऱ्यांच्या जिवाला सतत धोका निर्माण होत आहे. याकडे पुणे महानगरपालिका आणि वीज वितरण कंपन्यांकडून अनधिकृत केबल्स कापण्याकडे डोळेझाक केली जात आहे. वाहनधारक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अंडरग्राउंड केबल्स टाकणे अपेक्षित असताना काही कंपन्या याला फाटा देत विनापरवाना ओव्हरहेड केबल टाकतात. यातून कोट्यवधींचा फायदा होतो; पण अशा लोंबकळणाऱ्या केबल्समुळे नागरिकांचा बळी जात आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत; महापालिका आयुक्तांनीच घ्यावा पुढाकार

- खासगी कंपन्यांना रस्ता खोदून केबल टाकण्यासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. खोदाईतील संपूर्ण माती, राडारोडा उचलून महापालिकेला प्रतिमीटर साडेबारा हजार रुपये शुल्क मोजावे लागते.

- केबल टाकताना एकाच वेळी ५० मीटर खोदाई बंधनकारक असते. हे काम करताना वाहतुकीला अडथळा ठरू नये, खोदाईच्या भोवती सुरक्षा पट्टे लावणे बंधनकारक असते. रात्रीच्या वेळी खोदाई करावी तसेच शहर वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागते. अशा जाचक अटी आणि शुल्क वाचविण्यासाठी कंपन्या व ठेकेदारांकडून नियमांना बगल दिली जाते.

- खोदाई करताना केबल प्रचलित मानांकामध्ये निश्चित केलेल्या खोलीवर टाकावी लागते. एक कि.मी. केबल खोदाईसाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे शुल्क द्यावे लागते. हे शुल्क वाचवण्यासाठीच कंपन्या पथदिव्यांवर, उंच इमारतींवर तसेच झाडांवर केबल टाकतात.

- अशा कामांसाठी पुण्यातील काही बडे राजकारणी, स्वयंघोषित समाजसेवक व परिसरातील वजनदार व्यक्तींची मदत घेतली जाते. अनेकांचे यात अर्थपूर्ण संबंध असल्याने अशा अनधिकृत केबलबाबत तक्रार केली जात नाही. यामुळेच पुणे शहरातील रस्ते, चौक, फुटपाथ, झाडेझुडपे आणि पथदिवे व विजेच्या खांबांवर आणि झाडांवर अनधिकृत केबलचे जाळे वाढतच चालले आहे.

- प्रशासन अनधिकृतपणे केबल टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रारींची वाट पाहत बसते. केबलमुळे अपघातात कोणी जखमी झाले अथवा एखाद्याचा बळी गेला, तर थातूरमातूर तेवढ्या भागात कारवाई केली जाते. विसर पडल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. यामुळे पुणे शहरात अनधिकृत केबल टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी महापालिका आयुक्तांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune's cable chaos: Illegal wires endanger lives, cost municipality millions.

Web Summary : Illegal cable networks in Pune pose a deadly threat, with accidents rising. Companies bypass regulations, costing the municipality revenue. Officials are slow to act, awaiting complaints instead of proactively enforcing rules, endangering citizens.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र