शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 19:44 IST

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण १५ दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

भोर : भोर, बारामती आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) आज दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १०० टक्के भरले आहे. धरणातून ५ स्वयंचलित दरवाजांमधून १,४०० क्युसेक आणि वीजनिर्मिती केंद्रातून १,६५० क्युसेक, असे एकूण ३,०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

शाखा अभियंता गणेश टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण १५ दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.विशेषतः भुतोंडे आणि वेळवंड खोऱ्यातील जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाटबंधारे विभाग, पुणे येथील कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल यांनी सांगितले की, धरण पूर्णपणे भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाटघर धरणाची वैशिष्ट्ये -

पाणी साठवण क्षमता : २३ टीएमसी

दरवाजांची संख्या : एकूण ८१ (४५ स्वयंचलित, ३६ रोलिंग)

विसर्ग क्षमता : एका वेळी ५७,००० क्युसेक

सध्याचा विसर्ग : ३,०५० क्युसेक (५ स्वयंचलित दरवाजांमधून)

नीरा-देवघर धरण ९८ टक्के भरले -

दरम्यान, हिर्डोशी खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नीरा-देवघर धरण ९८ टक्के भरले आहे. येत्या दोन दिवसांत हे धरणदेखील १०० टक्के भरेल, अशी शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. भुतोंडे आणि वेळवंड खोऱ्यातील पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.यंदा ऑगस्ट महिन्याच्या मध्यात पावसाने उसंत घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र