पुणे : महाकालेश्वर आणि उत्तरेकडील इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेकडून भारत गौरव ट्रेन चालवणार आहे. या दौऱ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) करणार आहे. दि. २५ एप्रिल ते ५ मेदरम्यान ही तीर्थयात्रा असून, त्यामध्ये उज्जैन, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर, वैष्णोदेवी आणि परतीच्या प्रवासाचा समावेश आहे.
भारत सरकारने संकल्पित केलेल्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उत्कृष्ट पर्यटन संकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत गौरव पर्यटन गाड्या चालवत आहे. त्यातून देशांतर्गत पर्यटकांसह आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा दाखवण्यासाठी संकल्पित केल्या आहेत. भारत गौरव एक्स्प्रेस महाकालेश्वर आणि उत्तर भारत दर्शन यात्रेसाठी पुणे विभागातील दौंड स्थानकावरून दि. २५ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता गाडी सुटेल. दि. ५ मे रोजी रात्री साडेआठ वाजता दौंड स्थानकावर परत येईल.
त्यात मथुरा, हरिद्वार, अमृतसर आणि वैष्णोदेवी येथे मुक्काम असून, या यात्रेत बुकिंग केलेले प्रवासी पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि उज्जैन येथे चढू आणि उतरू शकतात. या यात्रेसाठी १४ एलएचबी रेक असून, त्यामध्ये एक वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, सात शयनयान, दोन पॉवर कार आणि एक पॅन्ट्री कारचा समावेश आहे.
Web Summary : IRCTC launches Bharat Gaurav train from Pune, April 25-May 5, covering Mahakaleshwar, Mathura, Haridwar, Amritsar, Vaishnodevi. Bookings available at major stations.
Web Summary : आईआरसीटीसी ने पुणे से 25 अप्रैल-5 मई तक भारत गौरव ट्रेन शुरू की, जिसमें महाकालेश्वर, मथुरा, हरिद्वार, अमृतसर, वैष्णोदेवी शामिल हैं। प्रमुख स्टेशनों पर बुकिंग उपलब्ध।