बारामती ( पुणे जि.) - अष्टविनायकातील पहिले स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरातील भाद्रपदी यात्रा उत्सवाला आज (२४ ऑगस्ट) पासून प्रारंभ झाला. या यात्रेनिमित्त पाच दिवस मुख्य गाभाऱ्यातील श्री मयुरेश्वराचे जलस्नान व पूजा करण्याची संधी भाविकांना उपलब्ध राहणार आहे.पहिल्याच दिवशी या महोत्सवाला भाविकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल एक लाखांहून अधिक भक्तांनी जलस्नानाचा लाभ घेतला. पहाटे चार वाजल्यापासून मंदिरासमोर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषांनी मोरगाव परिसर दुमदुमून गेला.
Video : मोरगाव येथे भाद्रपदी यात्रेला सुरुवात; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 15:17 IST