शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी; लाखो रुपयांचे भत्ते थकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:29 IST

- लाडकी बहीण योजनेचे अर्ज जमा करण्यासाठीचे मानधनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

पुणे : राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणींसाठी काम करणाऱ्या राज्यातील काही काही लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपयांचे भत्ते मात्र थकवले आहेत. लाडकी बहीण योजनेचे अर्ज जमा करण्यासाठीचे मानधनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

राज्यात अंगणवाडी योजनेत काही लाख महिला सेविका व मदतनीस म्हणून काम करतात. सेविकेला १० हजार व मदतनीस महिलेला ८ हजार रुपये मानधन मिळते. त्यात वाढ व्हावी अशी अनेक वर्षांची मागणी होती. सरकारने ती ऑक्टोबर २०२४ मध्ये मान्य केली. सेविकेला १५ हजार रुपये, मदतनिसाला १३ हजार रुपये मानधन देणार, असे जाहीर केले. प्रत्यक्षात सेविकेला १३ हजार व मदतनिसाला १० हजार रुपये देण्याचे पत्रक काढले. उर्वरित रक्कम ॲप आधारित कामांच्या टक्केवारीवर प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येईल, असे जाहीर करून त्याचे कोष्टकही जाहीर केले.

त्यानुसार ॲप आधारित कामे (माता, बालके यांची गृहभेट, पोषण आहार वाटप, पूर्व शालेय शिक्षण दिवस भरणे, आजारपणाची संख्या कमी करणे ही कामे करून ती ॲपवर अपलोड करणे) ७० टक्के पूर्ण केली तर १४०० रुपये, ८० टक्के झाली तर १६०० रुपये, ९० टक्के झाली तर १८०० रुपये व १०० टक्के झाली तर २ हजार असे निश्चित केले. मदतनीस महिलांनाही याच प्रमाणे ७००, ८०० व पुढे ९००, १ हजार रुपये असा प्रोत्साहन भत्ता निश्चित केला. जास्त पैसे मिळणार या आशेने अंगणवाडी सेविका व मदतनीस ऑक्टोबर २०२४ पासून काम करत आहेत. मात्र, हा प्रोत्साहन भत्ता फक्त मदतनीस महिलांच्याच बँक खात्यात जमा झाला आहे.

राष्ट्रीय मजदूर संघाच्या अंगणवाडी विभागाच्या पदाधिकारी गीतांजली थिटे, जयश्री जठार, सुजाता शेडगे, सरोजिनी भांबरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेत सुरुवातीच्या काळात अनेक महिलांना आम्ही अर्ज लिहून दिले. त्यासाठीही आम्हाला मानधन मिळणार होते. मात्र, तेही अद्याप अनेक ठिकाणी मिळालेले नाही. प्रोत्साहन भत्ता व हे मानधन यातून सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये थकले आहेत. ते मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादी मजदूर संघाच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे, असे थिटे यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Anganwadi Workers Await Payments While 'Beloved Sister' Scheme Rolls Out

Web Summary : Despite Maharashtra's 'Beloved Sister' scheme, Anganwadi workers haven't received promised incentive payments for months. Arrears remain unpaid, including application processing fees for the scheme itself, leaving workers financially strained.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेladki bahin yojanaलाडकी बहीण योजना