शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र ओलांडून अफगाणी सफरंचद पुण्यात दाखल; तुलनेत १०० ते २०० रुपयांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:10 IST

वाहतूक खर्चात वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरात ही दहा किलोमागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

पुणे : पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने एरवी पाकिस्तानमार्गे दाखल होणारे अफगाणी सफरचंद इराणहून समुद्रमार्गे भारतात दाखल होऊ लागले आहे. नव्या मार्गामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. तरी हाताळणी कमी झाल्याने दर्जेदार सफरचंद बाजारात उपलब्ध होत आहे.

घाऊक बाजारात सध्या दहा किलोला ९०० ते १००० रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात सर्व प्रकारच्या सफरचंदाची दर्जानुसार १६० ते ३२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात देशासह परदेशातून सफरचंद दाखल होत आहेत. यंदा हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये अतिवृष्टी झाली. त्याचा फटका येथील सफरचंदाच्या बागांना मोठ्या प्रमाणात बसला. परिणामी, देशी सफरचंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे.- अतिवृष्टीचा फटका; दरात १०० ते २०० रुपयांची वाढ

अफगाणिस्तान येथून सफरचंद इराणमध्ये दाखल होत आहे. त्यानंतर इराण येथून समुद्रमार्गे ती मुंबई येथे व तेथून देशभरात जात आहेत. रस्तेमार्गाने होणारी फळांची हाताळणी कमी झाली आहे. त्यामुळे, सफरचंदाची गुणवत्ता टिकण्यास मदत झाली आहे. मात्र, समुद्रामार्गे वाहतूक होत असल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, गतवर्षी दहा किलोला ८०० ते ९०० रुपये मिळणारा दर यंदा ९०० ते १ हजार रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये दहा किलो मागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे.- अफगाणिस्तानी सफरचंदाचा हंगाम पंधरा दिवस आधीच

सद्यस्थितीत मार्केट यार्ड फळबाजारात दर्जेदार अफगाणी सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. अफगाणिस्तान येथील सफरचंदाचा हंगाम मागील वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधी सुरू झाला आहे. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरात ही दहा किलोमागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. असे आहेत दर

सफरचंद वजन             घाऊक दरकाश्मीर १४ ते १६ किलो : १००० ते १४००

किन्नोर १० किलो : १६०० ते १८००अफगाणी १० किलो : ९०० ते १०००

 लाल जर्द आणि कोणतीही वॅक्सीन प्रक्रिया केलेली नसल्याने या सफरचंदांना पुणेकरांची अधिक पसंती मिळत आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र पंधरा दिवस आधीच हंगाम सुरू झाला असला तरी सफरचंदला चांगली मागणी आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने समुद्र ओलांडून अफगाणी सफरचंद पुण्यात दाखल होत आहेत. - शिवजित झेंडे, फळ आयातदार, मार्केट यार्ड

English
हिंदी सारांश
Web Title : Afghan Apples Reach Pune Via Sea Route; Prices Rise

Web Summary : Afghan apples, rerouted via sea due to border closures, are now available in Pune. Despite increased transport costs, the quality is better due to less handling, resulting in a price increase of ₹100-200 per 10kg.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे