शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pune airport : पुणे विमानतळावरून शनिवारी इंडिगोच्या ६९ विमानांचे उड्डाण रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 13:14 IST

-हवाई वाहतूक मंत्रालयाने भाडेदरात मर्यादा लागू केल्यामुळे प्रवाशांना दिलासा

पुणे : लोहगाव विमानतळावर शनिवारी (दि. ६) रोजी ३ हजार ५०९ प्रवाशांचे आगमन झाले, तर ३ हजार ६५० प्रवाशांनी प्रस्थान केले आहे. दिवसभरात एकूण २२ विमानांचे आगमन, तर २५ विमानांचे उड्डाण झाले आहे. मात्र, यामध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या ३४ विमानांचे आगमन आणि ३५ विमानांचे उड्डाण असे एकूण ६९ विमानांचे उड्डाण रद्द झाले आहे. त्यामुळे पुणेविमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सने प्रवास करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.

पुणे विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या आणि बाहेरून पुण्यात येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सची सेवा अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. त्याचा फटका हजारो प्रवाशांना अजूनही बसत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली ही परिस्थिती शनिवारीही कायम होती.

सेवेवर परिणाम होत आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या सततच्या व्यत्ययांमध्ये देखील सुरळीत कामकाज आणि प्रवाशांना मदत मिळावी यासाठी पुणे विमानतळ प्रशासन सातत्याने समन्वय साधत आहे. तसेच सर्व सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.

- एअर इंडिया : ०३/०३

- अलायन्स एअर : ००/००

- इंडिगो : ०७/१०

- स्पाइसजेट : ०१/०१

- एआयएक्स : ०५/०५

- अकासा एअर : ०३/०३

- स्टार एअर : ०१/०१

- फ्लाय ९१ : ०२/०२

----------------------------

उड्डाणे रद्द करणे (आगमन/निर्गमन)

- एअर इंडिया : ००/००

- अलायन्स एअर : ००/००

- इंडिगो : ३४/३५

- स्पाइसजेट : ००/००

- एआयएक्स : ००/००

- अकासा एअर : ००/००

- स्टार एअर : ००/००

- फ्लाय ९१ : ००/००

ऐनवेळी विमान रद्द होणे, सणासुदीचा कालावधी आणि सुट्ट्यांमध्ये विमान कंपन्या प्रवासी भाड्यात मनमानी पद्धतीने वाढ करतात. सर्वसामान्य प्रवाशांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये आणि हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवासी भाड्यावर मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५०० ते १५०० किलोमीटर व त्यापुढील अंतरासाठी ठरवलेल्या कमाल भाड्याच्या दरात मर्यादा लागू केल्यामुळे हवाई प्रवास प्रवाशांच्या आवाक्यात राहील. - मुरलीधर मोहोळ, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री उड्डाणे (आगमन / निर्गमन)

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Airport: Indigo cancels 69 flights on Saturday, causing passenger distress.

Web Summary : Indigo cancelled 69 flights at Pune Airport on Saturday, impacting thousands. While 22 flights arrived and 25 departed, Indigo's service disruptions continue. Airport authorities coordinate to minimize passenger inconvenience. Minister Mohol noted airfare regulations aim to protect passengers from excessive pricing.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAirportविमानतळ