शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची चाहूल : क्रीडा स्पर्धा, समाजोपयोगी उपक्रमांना सुगीचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 00:43 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले. त्याच्या पार्श्वभूमीवर क्रीडा स्पर्धा व समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू झाली आहे.

दावडी : लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले. त्याच्या पार्श्वभूमीवर क्रीडा स्पर्धा व समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू झाली आहे. लाखाचे बक्षीस व त्या कार्यक्रमाचा खर्चसुद्धा आपण देणार फक्त आपल्यालाच तेथे बोलावून मंचावर भाषण करण्याची संधी द्यावी, या माध्यमातून लोकसभा निवडणुकीआधी तिकीट खिशात असलेल्या उमेदवारांनी प्रचाराचे जणू दालनच आपल्यासाठी खुले केले आहे.खेड तालुक्यात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात गावागावांमध्ये सध्या मोठ्या सामाजिक कार्यक्रमासोबतच क्रीडा स्पर्धेचे पेव फुटले आहे. समाजोपयोगी शिबिरे, कबड्डी, क्रिकेट या क्रीडा स्पर्धांमधून हजारो रुपयांचे बक्षीस जाहीर केले जाते. त्याच्या मोबदल्यात कार्यक्रमाचे आयोजक त्यांच्या नेत्यांचे मोठमोठे जाहिरातीचे फलक लावतात. मोठे छायाचित्र झळकेल, अशी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे गावात गठ्ठा मतदान दाखवा किंवा गावातील प्रतिष्ठित वजनदार नेतेमंडळी एका मंडपाखाली बोलवा व बक्षीसरुपाने घसघशीत रक्कम मिळवा, अशा हेतूने समाजोपयोगी म्हटले जाणारे कार्यक्रम घेण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.विशेष म्हणजे मागील २०१४ पासून उल्लेखनीय म्हणावा असा कार्यक्रम किंवा समाजोपयोगी कार्यक्रम मतदारसंघातील कोणत्याही गावात झालेला नसल्याचे चित्र आहे. ते आज या घडीला पाहावयास मिळत आहे. ह्या आयोजनावरून वरूनच गावागावात आपसूकच दोन गट पडत असल्याचे चित्रसुद्धा पाहावयास मिळत आहे. याशिवाय तालुक्यातील गावागावातील तरुण युवकवर्ग आमच्या गावात खेळाचे सामने घ्यायचे आहेत. अशी कैफियत घेऊन पक्षाच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांच्या भेटण्यासाठी आग्रही असल्याचेसुद्धा दिसून येत आहे. तसेच छोटे-मोठे कार्यक्रमदेखील इच्छुक उमेदवार मंडळी न सांगता जेथे गर्दी आहे तिथे हजेरी लावत असल्याचे चित्रदेखील पाहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुक्यात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपली चर्चा लोकसभेच्या उमेदवारी आधी आपला प्रचार कसा होईल, याबाबतची स्पर्धा रंगली आहे.तालुक्यात कोणत्याही गावात सुरू असलेल्या स्पर्धेबाबत विविध पक्षाच्या जाहिराती फलकावर नेत्यांची प्रतिमा झळकते ती व्यक्ती कोणीही असली तरी घसघशीत रक्कम मिळत असल्याने संघ व खेळाडूंमध्ये आनंद आहे.लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवार कधी ५ वर्षांच्या आधी कधी कोणाची दशक्रिया असो किंवा गावच्या यात्रा-जत्रा असो.कधी दिसले नाही. मात्र सध्या सर्व मंडळी निवडणूकतोंडावर आल्याने गोरगरिबांच्या कार्यक्रमालासुद्धा हजेरीलावत आहेत.तसेच भाषणबाजीतून मी कसा सक्षम आहे, हे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. दशक्रिया हा दु:खाचा कार्यक्रम असतो. त्यामध्येही कुठलेही भान न ठेवता काहीतरी जोक करून नेतेमंडळी उपस्थितांना हसविण्यात मग्न असल्याचे चित्रदिसत आहे.जिल्हाभर सध्या क्रिकेट स्पर्धांचे जणू पेवच फुट आहे. इच्छुक उमेदवार या स्पर्धेचा सर्व खर्च उचलताना दिसत आहेत. यानिमित्त ते फ्लेक्सवरही झळकत आहेत.

टॅग्स :Puneपुणे