पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या ३२ गावांमध्ये प्रत्येकी एक असे ३२ रस्ते दर्जेदार स्वरूपाचे करण्याचे नियोजन महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात करण्यात आले आहे. याशिवाय गावांमधील दैनंदिन व्यवस्थापन आणि प्राथमिक कामांसाठी ३०० कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद प्रकल्पांच्या निधीशिवाय असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्तांनी सोमवारी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. या अंदाजपत्रकात महापालिका हद्दीत समावेश झालेल्या ३२ गावांमधील नागरिकांच्या सोयी व सुविधांसाठी स्वतंत्र अशी तरतूद केली आहे.
महापालिकेने गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींच्या योजनांचे नियोजन केले असून रस्ते विकासाठी ११० तर मलनिस्सारणाच्या व्यवस्थापनासाठी ७५० कोटींचे प्रकल्प हाती घेतले आहे. प्रकल्पीय तरतूद सोडून महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात दैनंदिन व्यवस्थापन व प्राथमिक कामांसाठी ३०० कोटींची तरतूद केली आहे. या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट प्रत्येक गावात प्रत्येकी एक रस्ता दर्जेदार व प्रशस्त करण्याचे प्रस्तावित केले आहे.
Web Summary : Pune Municipal Corporation will construct 32 high-quality roads, one in each of the 32 newly included villages. ₹300 crore allocated for daily management and primary works, separate from project funds. Focus on water supply, roads, and sewage management.
Web Summary : पुणे नगर निगम 32 नए शामिल गांवों में 32 उच्च गुणवत्ता वाली सड़कें बनाएगा। दैनिक प्रबंधन और प्राथमिक कार्यों के लिए ₹300 करोड़ आवंटित, परियोजना निधियों से अलग। जल आपूर्ति, सड़कों और सीवेज प्रबंधन पर ध्यान केंद्रित किया गया है।