पुणे : राज्यात माहिती-तंत्रज्ञान, डिजिटल मीडिया आणि नवउद्योगांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी मुंबई महानगराच्या धर्तीवर पुण्यात ‘ग्रोथ हब’ विकसित करण्याची घोषणा केली असून मुंबई आणि पुणे येथे मिळून ५० अब्ज डॉलर्स क्षमतेचे मीडिया-टेक आणि एव्हीजीसी (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात सुमारे ३० लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबई आणि पुणे ही देशातील आयटी, डिजिटल मीडिया आणि स्टार्टअप क्षेत्रातील प्रमुख केंद्रे म्हणून वेगाने पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांमध्ये जागतिक दर्जाचे मीडिया-टेक आणि एव्हीजीसी केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स उद्योगांना प्रोत्साहन मिळणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केले जाणार आहे.
पुण्यात उभारण्यात येणाऱ्या ‘ग्रोथ हब’मुळे स्टार्टअप्स, आयटी कंपन्या, संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना एकत्रित व्यासपीठ मिळणार आहे. या हबमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, संशोधनासाठी आवश्यक साधने, प्रशिक्षण केंद्रे आणि उद्योगांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे शहराला देशातील प्रमुख नवउद्योग केंद्र म्हणून अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Web Summary : Maharashtra to create growth hubs in Pune and Mumbai, aiming for 3 million jobs. The project includes media-tech and AVGC centers with $50 billion investment, boosting IT, digital media, and startups, especially animation and gaming industries.
Web Summary : महाराष्ट्र सरकार पुणे और मुंबई में ग्रोथ हब बनाएगी, जिसका लक्ष्य 30 लाख नौकरियां पैदा करना है। इस परियोजना में 50 अरब डॉलर के निवेश के साथ मीडिया-टेक और एवीजीसी केंद्र शामिल हैं, जो आईटी, डिजिटल मीडिया और स्टार्टअप, विशेष रूप से एनीमेशन और गेमिंग उद्योगों को बढ़ावा देंगे।