शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुणे हे विकासाचे नवे ‘स्मार्ट मॉडेल’ : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 12:58 IST

राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे ‘स्मार्ट मॉडेल’ म्हणून विकसित होत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

ठळक मुद्दे'शहराच्या विकासासाठी ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमीटेड’ कंपनीची स्थापना'विविध योजनांमुळे पुणे शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे : गिरीश बापट

पुणे : ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याची देशात वेगळी ओळख आहे. गेल्या तीन वर्षात ही ओळख आणखी दृढ झाली असून माहिती-तंत्रज्ञान आणि आॅटोमोबाईलचे देशातील प्रमुख केंद्र्र म्हणूनही जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. तसेच राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे ‘स्मार्ट मॉडेल’ म्हणून विकसित होत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या ध्वजारोहणानंतर बापट बोलत होते. कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस सह आयुक्त रवींद्र कदम, जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उप जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, न्यायमूर्ती, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.स्मार्ट सिटी अंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांची माहिती देताना बापट म्हणाले, की शहराच्या विकासासाठी ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमीटेड’ या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सोलर सिटी, घनकचरा व्यवस्थापन, समान पाणीपुरवठा आणि स्मार्ट मिटरींग, झोपडपट्टी पुनर्विकास, स्मार्ट रस्ते, फुटपाथ, लाईट हाऊस, सेंट्रल कमांड कंट्रोल सेंटर, कॉमन मोबिलिटी कार्ड, सार्वजनिक वाहतुकीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची निर्मिती होणार आहे. यासर्व कामांना सुरुवात झाली असून या योजनेमुळे पुणे शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती सांगून बापट यांनी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली.बापट यांनी परेडचे निरीक्षण करुन मानवंदना स्वीकारली. पथ संचलनात राज्य राखीव पोलीस दल, महिला पोलीस पथक, पुणे ग्रामीण, पुणे शहर यांच्या जवानांनी भाग घेतला. तसेच सामाजिक वनीकरण, सामाजिक न्याय विभाग, सर्व शिक्षा अभियान, जलयुक्त शिवार अभियान, पुणे मनपा, स्वच्छ भारत मिशन यांचे चित्ररथ सहभागी झाले होते.दरम्यान, बापट यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक विजेते, जिल्हा क्रीडा पुरस्कार,  गुणवंत क्रीडा शिक्षक, गुणवंत क्रीडा संघटक, राष्ट्रीय हरित सेना पंचतारांकित शाळा आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे