अकोला : महाबीजच्या सोलर शीतगृहात भाजीपाला बियाण्यांचे होणार संवर्धन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:27 PM2018-01-12T14:27:54+5:302018-01-12T14:33:12+5:30

अकोला : सोलर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) हा उपक्रम असून, संकरित भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे.

Akola: Vegetable seeds will be cultivated in Mahabija Solar Cold storage | अकोला : महाबीजच्या सोलर शीतगृहात भाजीपाला बियाण्यांचे होणार संवर्धन!

अकोला : महाबीजच्या सोलर शीतगृहात भाजीपाला बियाण्यांचे होणार संवर्धन!

Next
ठळक मुद्देसोलर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. संकरित भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे.राज्यातील बहुदा हे एकमेव सोलरवर चालणारे शीतगृह असेल, असे सांगण्यात येत आहे.


अकोला : सोलर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) हा उपक्रम असून, संकरित भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे. यामुळे राज्यातील शेतकºयांना राज्यातच भाजीपाला बियाणे मिळणार आहे. हे शीतगृह बांधण्याचे काम सुरू असून, सोलरवरील हे राज्यातील पहिले शीतगृह असल्याचे वृत्त आहे.
महाबीजने राज्यात गोदामांची शृंखला तयार केली असून, शेतकºयांना बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठीचे हे नियोजन करण्यात आले आहे. हायब्रीड भाजीपाला बियाणे उत्पादनावर भर देण्यात येत आहे. यासाठी लागणारे बियाणे शीतगृहात ठेवावे लागतात. याच पृष्ठभूमीवर महाबीजने शीतगृह उभारणीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सोलर विजेवर हे शीतगृह निर्माण करण्यात येणार आहे. महाबीजच्या मुख्यालयांतर्गत शिवणी येथे शीतगृह उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुदा हे एकमेव सोलरवर चालणारे शीतगृह असेल, असे सांगण्यात येत आहे.
राज्यात महाबीजची २३ जिल्ह्यांत कार्यालये आहेत. उर्वरित जिल्ह्यातही जागा मागणीचा प्रस्ताव महाबीजने तयार केला असून, शासनामार्फत जिल्हाधिकाºयांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. शेतमालावर प्रक्रिया आवश्यक असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांत प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच या सर्व ठिकाणी गोदाम निर्मिती केली जाणार आहे.
 

संकरित भाजीपाल्यावर भर
भाजीपाल्याची वाढती गरज बघता, महाबीज आता संकरित भाजीपाला निर्मितीसाठी भाजीपाला बियाणे निर्मितीवर भर देत आहे. त्यासाठीच शीतगृहाची गरज असल्याने या शीतगृह उभारणीचा निर्णय घेतला असून, सोलर शीतगृहाचे बांधकाम अकोल्यात सुरू आहे.

-संकरित भाजीपाला संशोधनावर भर देण्यात आला आहे. या बियाण्यांची थंड ठिकाणी साठवण करावी लागते. तसेच मूळ संशोधित बियाणेदेखील थंड ठिकाणी ठेवावे लागते. यासाठीच शीतगृह उभारण्यात येत आहे. या शीतगृहाचे काम लवकरच पूर्ण होत आहे.
- ओमप्रकाश देशमुख,
व्यवस्थापकीय संचालक,
महाबीज,अकोला.

Web Title: Akola: Vegetable seeds will be cultivated in Mahabija Solar Cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.