शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडी सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 15:25 IST

एप्रिल महिन्यात कामाचे टेंडर निघणार; प्रवाशांचा मार्ग होणार सुकर

ठळक मुद्देउड्डाणपूल, मेट्रोसाठी सुविधा आणि भविष्यातील वाहतुकीच्या ताणाचा विचार करण्याची सूचनातळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता, पुणे-नगर रस्ता यांसह विविध विषयांवर चर्चा

नारायणगाव : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (रा. म. ६०) मोशी (इंद्रायणी नदी) ते राजगुरुनगर या टप्प्यातील रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहे. एप्रिल महिन्यात या कामाच्या निविदा निघणार आहेत. यामुळे चाकण चौकातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे. सोमवारी (दि. २) संसदभवनात शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांच्या कामासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत मोशी ते राजगुरुनगर (रा. म. ६०) तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता, पुणे-नगर रस्ता यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. खासदार डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामांची टेंडर प्रक्रिया प्राधान्याने करण्याच्या स्पष्ट सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांना दिल्या. 

मोशी (इंद्रायणी नदी) ते चांडोली (राजगुरुनगर) टप्प्यातील सहापदरीकरणाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार असून दोन महिन्यांत भूसंपादन करण्याचे पुण्याच्या जिल्हाधिकाºयांनी मान्य केले असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि एप्रिल महिन्यात निविदा काढा, असे आदेश दिले. यामुळे चाकण चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईन्मेंटचा विषय डॉ. कोल्हे यांनी उपस्थित करताच केंद्रीयमंत्री गडकरी यांनी महामेट्रोच्या ब्रिजेश दीक्षित यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून मेट्रो अलाईन्मेंटबाबत सूचना दिल्या...........बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा- चौफुला या रस्त्याचे काम केल्यास मुंबईकडून सोलापूरकडे जाणाºया जड वाहतुकीसाठी उत्तम पर्याय होऊ शकेल, शिवाय अहमदनगरकडून सोलापूरकडे जाणाºया वाहतुकीसाठी पर्याय निर्माण होऊन पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होईल, अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडली. त्यावर या रस्त्याचाही सविस्तर प्रकल्प अहवालही तयार असून १-२ महिन्यांत या रस्त्याची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिले...............सध्या सर्वाधिक ऐरणीवर असलेल्या पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर असल्याचे निदर्शनास आणून खासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने या रस्त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची त्वरित नियुक्ती करण्याची मागणी केली. सध्या असलेल्या रस्त्यावर उड्डाणपूल, मेट्रोसाठी सुविधा आणि भविष्यातील वाहतुकीच्या ताणाचा विचार करण्याची सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी करताच केंद्रीयमंत्री गडकरी यांनी ‘ग्रीनफिल्ड हायवे’ची शक्यता पडताळून पाहण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. ‘ग्रीनफिल्ड हायवे’ची संकल्पना प्रत्यक्षात आल्यास चाकण व रांजणगाव एमआयडीसीतील व सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या वाहतूककोंडीच्या त्रासातून होईल. परिणामी परदेशी उद्योगांसाठी चांगले वातावरण तयार होईल, असे खासदार डॉ. कोल्हे म्हणाले. 

टॅग्स :narayangaonनारायणगावhighwayमहामार्गDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNitin Gadkariनितीन गडकरी