शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

पुणे-नाशिक : धोकादायक पद्धतीने वाहनांचे पार्र्किं ग, महामार्गालगत पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 00:43 IST

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी रस्त्यावर आळंदी फाटा ते कुरुळी, चिंबळी, मोई फाट्यापर्यंत अवजड वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहने उभी करीत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत.

कुरुळी - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी रस्त्यावर आळंदी फाटा ते कुरुळी, चिंबळी, मोई फाट्यापर्यंत अवजड वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहने उभी करीत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत.खेड तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी रस्त्यावर जड मालवाहू गाड्यांची वर्दळ सतत वाढली आहे. वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने अवैधरीत्या भर रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने आळंदी फाटा, कुरुळी, चिंबळी फाटा, मोई व इंद्रायणी नदीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. चाकण परिसरातील आळंदी फाटा, निघोजे, कुरुळी, चिंबळी, मोई परिसरात अनेक लहान-मोठ्या कंपन्या व गोदामे उभारली आहेत. अशा कंपन्यांत कच्चा माल घेऊन येणारी अनेक वाहने रस्त्यावर उभी केली जातात. काही वाहनचालकांना तर आत कंपनीत जागा नाही असे सांगून दोन-तीन दिवस बाहेर ठेवले जाते.अन्य राज्यातून आलेल्या वाहनचालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा वेळी त्यांची वाहने ही कंटेनर किंवा त्याहीपेक्षा मोठी अवजड असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी वाढतच आहे. त्यामुळे रस्ता मोठा असला तरी वाहतुकीस अपुरा ठरत असून त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. यावर तातडीने पोलीस प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणीकेली जात आहे.'रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी करण्यात येणारी वाहने हटविण्यात यावीत, या रस्त्यावरून सतत जड मालवाहू गाड्यांची वर्दळ असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा मालवाहू अवजड वाहने उभी केली जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.ही बेकायदा पार्किंग अवैध वाहतूक करणारे हटविण्यात गरज निर्माण झाली आहे. यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र