शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Vande Bharat Express: पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, ५ हजार प्रवाशांना लाभ, ६७ लाखांचे रेल्वेला उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:35 IST

दररोज ही गाडी पुण्यातून शंभर टक्के भरून जात आहे. गेल्या आठ दिवसांत जवळपास ५ हजार नागरिकांनी यातून प्रवास केला आहे

पुणे: गेल्या दहा दिवसांपूर्वी पुणे-नागपूर दरम्यान ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. १२ तासांत प्रवास पूर्ण होत असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, बुधवार (दि. २०) पर्यंत आठ फेऱ्या झाल्या आहेत. यातून ४ हजार ९६५ प्रवाशांनी प्रवास केला असून, रेल्वेला ६७ लाख ९८ हजार ४४ इतके उत्पन्न मिळाले आहे.

पुण्यात विदर्भ आणि खान्देशात राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु या भागात जाण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहनांची सोय नाही. असेल तर सुरक्षित प्रवासाची गॅरंटी नाही. त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेला कायम गर्दी असते. नुकतेच नागपूर विभागातून पुणे शहरासाठी वंदे भारत एक्स्प्रेस (दि. १०) ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली. तिकीट दर जास्त असले तरी रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे ‘वंदे भारत’ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाडीला आठ डबे आहेत. यातून एकावेळी ६२० प्रवशांची क्षमता आहे. दररोज ही गाडी पुण्यातून शंभर टक्के भरून जात आहे. गेल्या आठ दिवसांत जवळपास ५ हजार नागरिकांनी यातून प्रवास केला आहे. यामुळे रेल्वे आणि प्रवासी या दोघांचा फायदा होत आहे.

डबे वाढण्याची शक्यता 

पुढील काही दिवसांत दसरा, दिवाळी सण येणार आहेत. दरम्यानच्या काळात रेल्वेला प्रचंड गर्दी असते. अनेक वेळा तिकीट न मिळाल्याने प्रवासी उभे राहून प्रवास करतात. सध्या वंदे भारतला प्रवाशांची वाढती गर्दी पाहता भविष्यात डबे वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशी आहे आकडेवारी 

एकूण फेऱ्या -- ०८एकूण प्रवासी -- ४९६५एकूण उत्पन्न -- ६७,९८,०४४

वंदे भारत एक्स्प्रेसला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातून ही गाडी दररोज भरून जात आहे. -हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी

टॅग्स :PuneपुणेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वेnagpurनागपूरpassengerप्रवासीticketतिकिट