शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

Narendra Modi Cabinet 2024: पुण्याच्या मुरलीअण्णांचा महापौर ते खासदार प्रवास; आता थेट मोदींच्या मंत्रिमंडळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 13:08 IST

पुणे महापालिकेच्या महापौर पदानंतर पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना मंत्रिपदाची ऑफर आल्याने पुणेकरांकडून कौतुकाचा वर्षाव

पुणे: देशात गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीचा ४ जूनला निकाल लागला. भाजपप्रणित एनडीए ने २९२ जागा जिंकल्या तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. पंतप्रधान मोदी यांनी ४००पार चा नारा दिला होता. पण ते शक्य झाले नही. त्यामुळे आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA तील घटक पक्षांना सोबत घेऊन मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधीसाठी विविध राज्यातील खासदारांना फोन आल्याची माहिती आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ ते ७ खासदारांची नावे चर्चेत आहेत. पुण्यातून महापौर पदावरून थेट खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला असल्याची माहिती आहे. महापौर ते खासदार असा प्रवास करणारे मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत. 

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात झाली. कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट हे सव्वातीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. पण, या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे १ लाख २३ हजार १६७ मताधिक्याने निवडून आले. सर्वत्र जल्लोष करत मोहोळ यांनी लोकसभेच्या आखाड्यात धंगेकरांना चितपट केले. 

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar mohol) हे कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. त्यांनी आरएसएस मधून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कोरोनाच्या महामारीत मोहोळ हे पुण्याच्या महापौर पदावर विराजमान झाले होते. त्यांनी त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केले आहे. तेव्हापासूनच पुणे शहरात त्यांची प्रतिष्ठा वाढली होती. पुणे खासदारपदासाठी भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांची नावे चर्चेत होती. परंतु मोहोळ यांचे काम पाहता त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यांनी या संधी साधून अखेर खासदारपदी विराजमान होण्याचा मान मिळवला. मुरलीधर मोहोळ यांना पहिल्यांदाच खासदारपद मिळाले आहे. अशातच त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातून मंत्रिपदाची ऑफर आल्याने पुणेकरांकडून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.     

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास 

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक- गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता- बूथ प्रमुख म्हणून भाजपामध्ये कामाला सुरुवात- युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाचीही संधी- संघटनेत ३० वर्षे कार्यरत- सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रातही योगदान- २००२, २००७ आणि २०१७ साली कोथरुडमधून नगरसेवक- २०१७ : साली स्थायी समिती धुरा- २०१९ : पुण्याच्या महापौरपदीसंधी- कोरोना काळात विविध पातळ्यांवर भरीव काम- २०२० : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी- २०२२ : सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा- २०२२ : पश्चिम महाराष्ट्राची भाजपाची जबाबदारी- ४ जून, २०२४ : खासदार, पुणे

महाराष्ट्रातून कोण होणार मंत्री?

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांची नावे जवळपास निश्चित आहेत तर एका खासदाराबाबत चर्चा सुरु आहेत. भाजपाकडून महाराष्ट्रात निवडून आलेल्यांपैकी माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे. तर रिपाईंचे रामदास आठवले यांनाही पुन्हा राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपाकडून सलग तिसऱ्यांदा खासदार बनलेल्या रावेरच्या रक्षा खडसे यांना आणि पुण्यातून महापौर पदावरून थेट खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला असल्याची माहिती आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी ७ खासदार निवडून आल्यानंतर, त्यांच्यापैकी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना शपथविधीसाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीmurlidhar moholमुरलीधर मोहोळNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४pune-pcपुणे