पुणे:पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ४० ही यंदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेतील लढत ठरली. मात्र या हाय-व्होल्टेज राजकीय संघर्षात ठाकरे गटाला मोठा झटका बसला असून भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. ‘कात्रजचा राजा’ म्हणून ओळख असलेल्या वसंत मोरे यांचे पुत्र रुपेश मोरे यांचा पराभव झाला असून भाजपच्या रंजना टिळेकर यांनी विजय मिळवला आहे.तर वसंत मोरे यांचा सुद्धा पराभव झाला आहे.
रुपेश मोरे यांना मतदारांनी नाकारल्याने ठाकरे गटाच्या आशांवर पाणी फेरले गेले. विशेष म्हणजे, याच निकालानंतर स्वतः वसंत मोरे यांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या भागात ठाकरे गटाची पकड कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ३८ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवली. भाजपचे संदीप बेलदरे, व्यंकोजी खोपडे आणि प्रतिभा चोरघे विजयी झाले असून राष्ट्रवादीकडून सिमा बेलदरे आणि स्मिता कोंढरे यांनी यश मिळवले आहे.
या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाल्याने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. दत्ता धनकवडे, वसंत मोरे आणि प्रकाश कदम यांना मतदारांचा कौल मिळू शकला नाही. या निकालामुळे आगामी काळात पुण्यातील स्थानिक राजकारण अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.प्रभाग क्रमांक-३८ विजयी उमेदवारसंदीप बेलदरे (भाजपा)व्यंकोजी खोपडे (भाजपा)प्रतिभा चोरघे (भाजपा)सिमा बेलदरे (राष्ट्रवादी)स्मिता कोंढरे (राष्ट्रवादी)मातब्बर पराभूतदत्ता धनकवडेवसंत मोरेप्रकाश कदम
Web Summary : In Pune's PMC election, Vasant More and his son lost, dealing a blow to Thackeray's Sena. BJP and NCP dominated Ward 38. Key leaders faced defeat, signaling shifts in Pune's political landscape. Future politics are expected to be more competitive.
Web Summary : पुणे पीएमसी चुनाव में वसंत मोरे और उनके बेटे की हार से ठाकरे सेना को झटका लगा। वार्ड 38 में भाजपा और एनसीपी का दबदबा रहा। प्रमुख नेताओं की हार से पुणे के राजनीतिक परिदृश्य में बदलाव के संकेत मिले हैं। भविष्य की राजनीति में प्रतिस्पर्धा बढ़ने की संभावना है।