शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या कारभारातला सावळा गोंधळ सुरुच; कोरोना रुग्णांची होतेय दुबार नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 19:30 IST

नुकताच शेकडो कोरोना रुग्णांचे अहवालच बदलले जाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी निदर्शनास आणून दिली बाब

पुणे : कोरोना रुग्णांचे आकडे दिवसागणिक वाढत असतानाच पालिकेच्या कारभाराचा गोंधळ सुरुच आहे. एकाच रुग्णाची दोनदा नोंदणी होत असल्याचे समोर आले असून यामुळे रुग्णसंख्या अधिक दिसत असल्याचे पोलिसांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसे पत्रच पुणेपोलिसांनी महापालिकेला पाठविले आहे.शहरातील नागरिकांची घशातील द्रावाची (स्वाब) तसेच रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची यादी पोलिसांकडेही पाठविली जाते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि रुग्ण शोधण्यासाठी पोलिसांना या यादीची मदत मिळते. पालिकेकडून पोलिसांना पाठविल्या जाणाऱ्या  यादीमध्ये संक्रमित रुग्णांची नावे, मोबाईल क्रमांक दिलेले असतात. या यादीमध्ये शेकडो रुग्णांची नावे आणि मोबाईल क्रमांक समान असल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये  देण्यात आलेल्या याद्यांमध्ये हा गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ६ ऑगस्टच्या यादीमध्ये पालिकेने १०१० रुग्णांची यादी दिली होती. यासोबतच अँटिजेन रुग्णांची संख्या ४९५ होती. दोन्हीमधील समान रुग्णांची संख्या ४७६ होती. प्रत्यक्षात नवीन रुग्णांची संख्या एकोणीसच होती. जवळपास ४७६ रुग्णसंख्या वाढलेली आहे. तर, ७ ऑगस्टच्या अहवालात पालिकेची रुग्णसंख्या १६५४ होती. तर, अँटिजेन रुग्णांची संख्या ४७५ होती. यातील प्रत्यक्षात नवीन रुग्ण ९ होते. या आकडेवारीत ४६६ रुग्ण वाढल्याचे दिसत आहे.असे प्रकार वारंवार घडत असून याबाबत पोलिसांनी आरोग्य विभागाला सुधारणा करण्याबाबत तसेच दुबार नोंदणी न करण्याबाबत कळविले आहे. आकड्यांमधील गोंधळाची ही माहिती पालिकेच्या यंत्रणेच्या लक्षात येणे गरजेचे होते. परंतू, ही बाब पालिकेच्या नव्हे तर पोलिसांच्या लक्षात आली. पालिकेकडून  शासनाला पाठविण्यात येत नसलेल्या आकडेवारीचा घोळ अद्याप संपलेला नसताना वाढीव रुग्ण दाखविले जात असल्याचे समोर आले आहे.  स्मार्ट सिटीकडूनही दोन दिवसांपुर्वी निगेटीव्ह रुग्णांची नावे पॉझिटीव्ह रुग्णांच्या यादीमध्ये टाकण्यात आली. तर, पॉझिटीव्ह रुग्णांची नावे निगेटिव्ह रुग्णांच्या यादीमध्ये कॉपी पेस्ट केली गेली. रुग्णांच्या आकडेवारीमध्ये अशा चुका घडू लागल्याने रुग्णसंख्येविषयीच शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस