शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कुणी लस देतं का लस! पुणे महापालिकेच्या लसींचा पुन्हा एकदा संपला साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 22:05 IST

मागणी आणि पुरवठ्याचं गणित जुळेना

पुणे : एकीकडे केंद्र सरकारने १८ वर्षांवरच्या सर्वांना सरसकट लसीकरण खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र पुणे महापालिकेवर कोणी लस देत का लस अशी मागणी करत फिरण्याची आत्ताच वेळ आली आहे.आत्ताच पुरेसा साठा मिळत नसेल तर सरसकट लसीकरण करणार कसं असा प्रश्न महापालिकेचा अधिकाऱ्यांना पडला आहे. गेले काही दिवस सातत्याने महापालिकेला लसींचा तोकड्या साठ्या मध्ये काम चालवावे लागत आहे.

पुणे महापालिकेला जास्त लसी मिळणार अशी घोषणा महापौरांनी केल्यानंतर देखील यात काहीच बदल झालेला नाहीये. गेल्या शनिवारी साथ संपत आल्यावर महापालिकेला फक्त ३५००० लसी मिळाल्या आहेत. यापूर्वी देखील कमी अधिक फरकाने अशीच परिस्थिती कायम राहिली आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवायची वेळ आली तरी देखील ही परिस्थिती फारशी बदलायला तयार नाही.

शनिवारी आलेल्या लसींपैकी मंगळवारसाठी फक्त २२,००० डोसेस शिल्लक आहेत. महापालिका हद्दीमध्ये दर दिवशी साधारण १७,००० ते ३१ हजारांचा मध्ये लसीकरण केले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. या परिस्थती मध्ये नेमकी कशी लसीकरणाची आकडेवारी वाढवायची आणि मागणी आणि पुरवठा याचा मेळ कसा साधायचा असा प्रश्न अधिकारी विचारात आहेत.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस