शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेची नवी मोहीम; अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तींना घरी जाऊन देणार लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 12:50 IST

अंथरूणाला खिळून असलेल्या व्यक्तीने प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांसहित अर्ज सादर ईमेल करावा

ठळक मुद्दे४० जण पात्र ठरले असून, यापैकी ९ जणांना मंगळवारी दिली लस

पुणे : शारिरिक हालचाल करू न शकणाऱ्या व विविध कारणांमुळे अंथरूणाला खिळून असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी महापालिकेकडे आजपर्यंत ७० अर्ज आले आहेत. यापैकी ४० जण पात्र ठरले असून, यापैकी ९ जणांना मंगळवारी लस देण्यात आली.  

शहरात लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ न शकणाऱ्या व ज्या व्यक्ती अंथरूणाला खिळलेल्या आहेत अशा व्यक्तीही लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी महापालिकेने घरी जाऊन लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी ती व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या लस घेण्यास सक्षम आहे. तसेच ही व्यक्ती अंथरूणाला खिळून आहे. यासाठीचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांसहित अर्ज सादर करावे असे आवाहन महापालिकेने केले होते.

या आवाहनानुसार ई-मेलव्दारे ७० जणांनी मागणी केली असून, यापैकी  ४० व्यक्तींसाठीच्या लसीकरणासाठी आवश्यक ती व योग्य प्रमाणपत्रे जोडण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून, या ४० जणांना लस दिली जाणार असल्याचे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. 

या लसीकरण मोहिमेत लस वाया जाऊ नये म्हणून एकाच विभागातील व्यक्तींची दररोज निवड करून त्यांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. तसेच लस दिल्यानंतर अर्धा तास संबंधित व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्षही ठेवले जात आहे. कोथरूड परिसरातील ९ जणांना लस याअंतर्गत देण्यात आली आहे.  

इच्छुकांनी येथे संपर्क साधावा 

ज्यांच्या कुटुंबातील सदस्य अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत आहेत अशांना लस हवी असल्यास सर्व कागदपत्रे व आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह bedriddenvaccination.pune@gmail.com या ई-मेलवर पाठवावे. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व्यक्तींना घरी येऊन लस देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही डॉ़ देवकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्यdocterडॉक्टर