पुणे :पुणे महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामार्फत भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. पीपीएम को-ऑर्डिनेटर, वरिष्ठ वैद्यकीय सुपरवायझर, टीबी हेल्थ व्हिजिटर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
पीपीएम को-ऑर्डिनेर पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन असणे अपेक्षित आहे. याचसोबत हेल्थ प्रोजेक्टसवर १ वर्ष काम करण्याचा अनुभव असावा. सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर पदासाठी बॅचरल डिग्री प्राप्त केलेली असावी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असावा.
टीबी हेल्थ व्हिजिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा विज्ञान शाखेतून पदवीधर असावा. याचसोबत त्याला कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन अर्ज दाखल करायचे आहेत. याबाबत सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.