शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पुणे महापालिकेच्या २० शाळांचे होणार विलिनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 16:35 IST

कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण

ठळक मुद्देसीएसआर मार्फत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन घेण्यास मान्यता१५० पेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये या विलिकरणामुळे मुख्याध्यापक नियुक्त करता येणारएका इमारतीत दोन सत्रात शाळा न ठेवता एकच शाळा शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा पालिकेचा खर्चही वाचणार

पुणे : पुणे महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये अपेक्षित पटसंख्या नाही व तरीही ते वर्ग चालू आहेत, अशा २० शाळांचे विलिकरण करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थी पटसंख्येची तपासणी केली असता, कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण त्याच इमारतीतील प्राथमिक शाळांमध्ये करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे पटसंख्या कमी असलेल्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा पालिकेचा खर्चही वाचणार आहे़. तसेच सद्यस्थितीला एकाच इमारतीत सकाळ व दुपार सत्रातील शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये या विलिकरणामुळे मुख्याध्यापक नियुक्त करता येणार आहे़. तसेच जास्तीत जास्त शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध होणार असून, एका इमारतीत दोन सत्रात शाळा न ठेवता एकच शाळा केल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययनाचे तासही वाढविता येणार आहे़. या निर्णयामुळे शहरातील महर्षीनगर येथील संत नामदेव प्राथमिक विद्यालय, भैरोबानाला येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालय, वानवडी येथील अमृता शेट्टीबा दशावतारी विद्यालय, नगर रोड खुळेवाडी येथील सन सेनापती जनरल अरूणकुमार वैद्य प्राथमिक विद्यालय, ढोले पाटील रस्ता येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, विश्रामबागवाडा येथील राजमाता जिजाबाई प्राथमिक विद्यालय येथील २२ शाळांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे़. तसेच या विलिनीकरणानंतर या ठिकाणी १ मुख्याध्यापक, २० उपशिक्षक, ६ बालवाडी शिक्षिका, ७ बालवाडी सेविका व ५ नवीन शिपाई मिळणार आहेत. 

सीएसआर मार्फत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन घेण्यास मान्यतापुणे शहरात दररोज दोन हजार ते बाविसशे मेंट्रिक टन कचरा जमा होत असून यामध्ये सॅनिटरी वेस्टचे प्रमाण सुमारे १२५ मेट्रिक टन आहे़ अशा सॅनिटरी वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी उपलब्ध यंत्रणा कमी पडत आहे़. त्यामुळे आता पुणे शहरामध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन व इन्सिनेरेशन युनिट देखभाल दुरूस्तीसह ५ वर्षांसाठी सीएसआर मार्फत, फायनान्शियल चार्जेस तसेच युजर चार्जेसमार्फत यंत्रणा उभारण्यासाठी अ‍ॅक्शन कमिटी अगेन्स्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस पुणे यांच्याशी करारनामा करण्यास आजच्या स्थायी समितीत मान्यता देण्यात आली़.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थी