शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

मनपा शाळेतील मुलींना मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 19:41 IST

नॅपकिन्स शास्त्रीय पद्धतीने नष्ट करणारी यंत्रणाही शाळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात १३ ठिकाणी मोबाईल टॉयलेट सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देस्थायी समितीची मान्यता : मोबाईल टॉयलेट सुरू करणारराज्य सरकारच्या अस्मिता योजनेच्या धर्तीवर ही योजना महापालिकेतर्फे सुरू

पुणे: महापालिकेच्या शाळांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन विनामुल्य देण्यास स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. पुढच्या टप्प्यात नॅपकिन्स शास्त्रीय पद्धतीने नष्ट करणारी यंत्रणाही शाळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात १३ ठिकाणी मोबाईल टॉयलेट सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.   नगरसेविका व महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले व मनिषा लडकत यांनी त्यांच्या समितीत हा प्रस्ताव मंजूर करून स्थायी समितीकडे पाठवला होता. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ११ ते १९ वयोगटांतील २५ हजार ८६४ विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन विनामुल्य उपलब्ध होणार आहेत. दर महिन्याला प्रत्येक मुलीला आठ नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी ४९ लाख ६५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अस्मिता योजनेच्या धर्तीवर ही योजना महापालिकेने सुरू केली आहे. याशिवाय पीएमपीएलच्या बसमध्ये बदल करून शहरात १३ ठिकाणी मोबाईल टॉयलेट सुरू करण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली. यासाठी महापालिका पीएमपीएलला २५ लाख ३३ हजार ५७२ रुपये अदा करणार आहे. पीएमपीएलच्या ताफ्यातून कमी करण्यात येणाºया बसगाडीचा यात वापर करण्यात येणार आहे. त्यात बदल करण्याचा खर्च सीएसआर मधून होणार आहे. महापालिकेने पीएमपीएलला बससाठी म्हणून ही रक्कम दिली आहे. याआधी १० बस अशा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या स्वच्छतागृहाची समस्या दूर करण्यात यश आले आहे. नव्याने हे टॉयलेट बसवण्यात येणाºया जागा याप्रमाणे, सिंध सोसायटी, आयटीआय रोड, संभाजी पार्क, सिमला आॅफिस, शनिवारवाडा, राजारामपूल, सनसिटी, बाणेर, फुलेनगर, चव्हाण शाळा, बिबवेवाडी, विश्रांतवाडी आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाwomen and child developmentमहिला आणि बालविकासStudentविद्यार्थीSchoolशाळा