शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवापराबाबत न्यायालयाच्या अवमानास पुणे महापालिकाच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 20:03 IST

पुण्याचा पाणीवापर नियंत्रित असावा यासाठी जलसंपदा मंत्रालयाने आदेश द्यावेत, अशी मागणीही पुणे पाटबंधारे मंडळाने केली आहे. 

ठळक मुद्देजलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन होत नसल्याची करुन दिली जाणीवपाटबंधारे विभागाचे महापालिकेला पत्र महापालिकेला मंजुर पाणीच घ्यावे लागेल : जलसंपदा विभाग

पुणे : जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका पाणी वापर करत नसल्याची जाणीव पाटबंधारे विभागाने महापालिका आयुक्त सौरव राव यांना पत्राद्वारे करुन दिली आहे. तसेच, या प्रकरणी न्यायाधिकरणाचा अवमान झाल्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास महापालिकाच जबाबदार असेल, असेही त्यात बजावण्यात आले आहे. तसेच, पुण्याचा पाणीवापर नियंत्रित असावा यासाठी जलसंपदा मंत्रालयाने आदेश द्यावेत, अशी मागणीही पुणे पाटबंधारे मंडळाने केली आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सप्टेंबर २०१७मध्ये पुणे शहराला वार्षिक ८.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीवापर मंजुर केला होता. म्हणजेच ६३५ दशलक्ष लिटर (एमएलडी) दररोज पाणी वापरता येईल. त्यानंतर खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, सध्या महानगरपालिका १३५० एमएलडी पाणी उचलत आहे. महानगरपालिकेने अद्यापही जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. खडकवासला धरणातून पाणी घेण्याची यंत्रणा महानगरपालिकेची आहे. ती त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन करुन पाणी घेण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. महानगरपालिका वापरत असलेल्या जास्तीच्या पाण्यामुळे हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यात सिंचनासाठी पाणी कमी पडते. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे कायदेशीर अडचणी उद्भवल्यास अथवा आदेशाचा अवमान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पुणे महानगरपालिकेचीच राहिल, असे पाटबंधारे विभागाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.  -----------------महापालिकेमुळे उन्हाळी आवर्तनावर येणार गदा!कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळ्यात  एक आवर्तन देण्याचा निर्णय झाला आहे. महानगरपालिकेच्या जास्तीच्या पाणीवापरामुळे उन्हाळ्यातील सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा राहणार नाही. जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेने पाणी वापर करावा यासाठी कालवा सल्लागार समितीला कळवावे, तसेच त्याबाबत आपण योग्य आदेश द्यावेत असे पत्रही पुणे पाटबंधारे विभागाने जलसंपदा मंत्र्यांच्या खासगी सचिवाला पाठविले आहे. ------------------

महापालिकेला मंजुर पाणीच घ्यावे लागेल : जलसंपदा विभागपुणे महापालिकेच्या पाणी वापराबाबत नुकतीच जलसंपदा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांची बैठक झाली. त्यात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या विरोधात निर्णय घेता येणार नसल्याचे मान्य करण्यात आले. याबाबत नक्की काय करायचे त्याचा निर्णय ८ दिवसांत घेण्याचे तत्वत: मान्य करण्यात आले. मात्र, आठ दिवसांत त्यावर नक्की निर्णय होईल असे नाही. ही बाब राज्यसरकारवर अवलंबून असल्याची माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका