शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पुणे महापालिकेने खुली केली शहरातील ३१ उद्याने;पण 'यांना' प्रवेश असणार मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 17:32 IST

कंटेन्मेंट झोनमध्ये येणारी उद्याने मात्र तूर्तास बंदच

ठळक मुद्देशहरात पालिकेच्या मालकीची आहेत २०४ उद्याने १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना मनाई 

पुणे : महापालिकेने राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निदेर्शांनंतर निर्गमित केलेल्या नव्या आदेशानुसार शहरातील काही उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी पालिकेच्या २०४ उद्यानांपैकी ३१ उद्याने उघडण्यात आली. कंटेन्मेंट झोनमध्ये येणारी उद्याने मात्र तूर्तास बंदच ठेवण्यात आली असून १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना उद्यानात येण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली. शहरात पालिकेच्या मालकीची २०४ उद्याने आहेत. प्रशासनाने लोकवस्ती, कोरोना रूग्णांची संख्या आदी गोष्टींचा अभ्यास करून ३१ उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश काढण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळपासून ही उद्याने उघडण्यात आली. यामध्ये शहराच्या पूर्व भागातील १२, पश्चिम भागातील ५, उत्तर भागातील ५, दक्षिण भागातील ५ आणि मध्य भागातील ८ उद्यानांचा समावेश आहे. सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन फास असे एकूण चारच तास ही उद्याने उघडी राहणार असून केवळ चालणे, धावणे यासाठीच उद्यानांचा वापर करता येणार आहे. उद्यानात बसणे, गप्पा मारणे, गर्दी करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कंटेन्मेंट झोन आणि अन्य परिसरातील उद्यानांचा अभ्यास करून सर्वसाधारणपणे धोका संभावणार नाही आणि नियम व निकष पळाले जातील अशा भागातील उद्याने उघडण्यात आली आहेत. यामधून कंटेन्मेंट झोन, लगतचा परिसर आणि लहान उद्याने वगळण्यात आली आहेत. आकाराने मोठी, चालणे आणि धावणे शक्य होईल तसेच सुरक्षित अंतर राखता येईल अशाच उद्यानांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टनसिंगचे नियम न पाळल्यास उद्याने पुन्हा बंद करण्यात येतील असेही घोरपडे यांनी संगीतले. ------- काय टाळावे १. सामुदायिकपणे व्यायाम करणे. २. गर्दी अथवा गट करून गप्पा मारणे.३. उद्यानात विनाकारण बसून राहणे. ४. उद्यानांतील खेळणी, बाकडे, व्यायामाची साधने वापरणे. -------- वेळा सकाळी : ६ ते ८ संध्याकाळी : ५ ते ७ ------------ उघडलेली ३१ उद्याने   दामोदरराव वागस्कर उद्यान कोरेगाव पार्क मंगलप्रकाश उद्यान बी. टी. कवडे रोड   अय्यप्पा उद्यान टिंगरेनगर लुंबिनी उद्यान म. हौ. बोर्ड, येरवडा  प्रगती उद्यान टिंगरेनगर  रोहन शिंदे उद्यान सर्वे क्र. 14, धानोरी  सुरेंद्र आनंद उद्यान गोकूळनगर, धानोरी स्वामी विवेकानंद उद्यान जॉगर्स पार्क, विमाननगर 03 उडान जैवविविधता उद्यान सर्व्हे क्र.119, विमाननगर   दामोदर गलांडे उद्यान कल्याणीनगर  भास्करराव शिंदे उद्यान सर्व्हे क्र. 46, चंदननगर  शिवाजी महाराज उद्यान ब्रह्मा सनसिटी, वडगावशेरी 08 मारुतराव गायकवाड उद्यान औंध  संजय निम्हण उद्यान सोमेश्वरवाडी, पाषाण  विठोबा मुरकुटे उद्यान सर्व्हे क्र. 35, बाणेर  जयभवानी उद्यान सर्व्हे क्र. 113, सुतारवाडी, पाषाण पंचवटी वनीकरण पंचवटी, पाषाण रस्ता  छ. संभाजी महाराज उद्यान डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर कमला नेहरू पार्क उद्यान एरंडवणा   हिरवाई उद्यान प्रभात रस्ता  पंडित भीमसेन जोशी उद्यान भुसारी कॉलनी  तात्यासाहेब थोरात उद्यान कोथरूड  शहीद मेजार प्रदीप ताथवडे उद्यान कर्वेनगर  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान पटवर्धन बाग   पृथक बराटे उद्यान वारजे उड्डाण पुलाखाली  राजा मंत्री उद्यान एरंडवणा   बाबूराव वाळवेकर उद्यान सहकारनगर   अहल्याबाई होळकर उद्यान कात्रज   सिंहगड विकास उद्यान सर्व्हे क्र. 58, वडगाव बुद्रूक  शहीद हेमंत करकरे उद्यान सर्व्हे क्र. 15-16, सातववाडी  स्वामी विवेकानंद उद्यान सर्व्हे क्र. 36 कोंढवा  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस