शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेला रस्ते दुरुस्तीची अतिघाई, नियमावली धाब्यावर ठेवून काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 12:55 IST

दुरुस्तीच्या अशास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यात रस्ते खड्ड्यात जाण्याची भीती

ठळक मुद्देपावसाळ्यात या रस्त्यांची दुरवस्था होणार असून लाखो रुपयांची उधळपट्टी होण्याची शक्यता

पुणे: पुणे शहरात नागरिकांची वर्दळ असणाऱ्या मध्यवर्ती भागात ठिकठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवली आहे. लक्ष्मी रस्ता, दगडूशेठ परिसर, अप्पा बळवंत चौक, या भागात मोठया बाजारपेठ आहेत. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी येथे येतात. सर्वच ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने महापाकिकेवर टीकाही होऊ लागली आहे. त्यांनी खोदाईच्या नियमाना धाब्यावर ठेवून हे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खड्डयात जाण्याची भीती सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे. शास्त्रीय पद्धतीने रस्त्यांची कामे करण्यासाठी तयार केलेल्या नियमावलीचा महापालिकेला विसर पडला आहे. चुकीच्या पद्धतीने खोदाई केल्यानंतर रस्ते घाईघाईने दुरुस्त करण्यासाठी अशास्त्रीय पद्धतीचा वापर महापालिकेच्या पथ विभागाकडून केला जात आहे. पावसाळ्यात या रस्त्यांची दुरवस्था होणार असून लाखो रुपयांची उधळपट्टी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 

रस्त्यांची कामे शास्त्रीय पद्धतीने व्हावीत. यासाठी चार वर्षांपूर्वी निवृत्त बांधकाम सचिवांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने भरपूर वेळ घालवून नियमावली तयार केली होती. त्याचा विसर महापालिकेला पडल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्ष्मी रस्त्याची खोदाई केल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र पावसाने दुरुस्त केलेल्या रस्त्यावरच खड्डे पडल्याचे पुढे आले आहे. काही भाग सिमेंटने दुरुस्त करण्यात आला आहे. तोही योग्य प्रकारे न झाल्याने रस्त्यांवर पाणी साचल्याचे समोर आले आहे. रस्त्याची कामे काळजी घेऊनच करावीत असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने महापालिका करत असलेल्या कामामुळे पुणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय ठरणार आहे. 

नियमावली काय सांगते? 

रस्ता खोदताना तिथे कामाची मुदत, स्वरूप, कंत्राटदाराचे नाव या सारख्या माहितीचा फलक लावण्याचा नियम आहे. संपूर्ण रस्त्याची सरसकट खोदाई न करता थोडा भाग खोदावा, तेथील काम पूर्ण करून रस्त्याची शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती करावी. मग पुढील भागाचे काम सुरू करावे. रस्ते दुरुस्तीनंतर त्या ठिकाणी पाणी साचणार नाही. याची काळजी घेऊन कामे करावीत. अशी नियमावली या समितीने तयार केली आहे.

 

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMONEYपैसाroad safetyरस्ते सुरक्षाSocialसामाजिक