शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर..., पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:59 IST

पुणे : एरवी ताणतणाव, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, प्रश्नोत्तरे याऐवजी महापालिकेच्या सभागृहाने खेळीमेळीचे, भारावलेले, मैत्रीपूर्ण वातावरण अनुभवले. पंचवार्षिक कारकिदीर्तील शेवटच्या सभेसाठी ...

पुणे : एरवी ताणतणाव, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, प्रश्नोत्तरे याऐवजी महापालिकेच्या सभागृहाने खेळीमेळीचे, भारावलेले, मैत्रीपूर्ण वातावरण अनुभवले. पंचवार्षिक कारकिदीर्तील शेवटच्या सभेसाठी उपस्थित असलेले १०० हून अधिक सभासद...सेल्फी काढण्यासाठी सरसावलेले स्मार्ट फोन...पुणेरी पगडी घालून मिरवणारे नगरसेवक...‘मतभेद असले तरी मनभेद असू नये’ हा संदेश देणारे आणि मिश्कील टिप्पणी करणारी भाषणे...काहींना भावना व्यक्त करताना अनावर झालेले अश्रू....अशा प्रसंगात सोमवारची सायंकाळ रंगली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांना अभिवादन करत सभागृहात ‘मन की बात’ केली.

पुणे महापालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. निवडणुका लांबल्याने मंगळवारपासून महापालिकेची सत्ता आता आयुक्तांच्या हाती जाणार आहे. आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी एरव्ही आक्रमक होणाऱ्या नगरसेवकांनी पाच वर्षांच्या आठवणींना आणि प्रवासाला उजाळा दिला. महापालिका म्हणजे अनेक विषय शिकवणारे विद्यापीठ असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली. महापालिकेतील पहिला दिवस ते अनुभवाच्या जोरावर सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी हिरिरीने घातलेला सहभाग हा आत्मविश्वास येथे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पक्षीय भेदाभेद न बाळगता सर्वच पक्षांमधील अनुभवी नेत्यांच्या भाषणातून खूप काही शिकायला मिळाल्याचे सर्वांनीच अधोरेखित केले. अजय खेडकर, अजय दरेकर, आदित्य माळवे, प्रवीण चोरबेले आदींनी मनोगत व्यक्त केले.

''हेतू चांगला असेल तर काम करण्याची संधी मिळतेच; नवीन सभागृह तयार होत असताना ज्येष्ठ सभासदांवर जबाबदारी होती. स्थायी समितीमध्ये काम करण्याचा अनुभव गाठीशी होता. सभागृह नेता म्हणून शहरातील मोठ्या प्रकल्पांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. आज सभागृहाचा शेवटचा दिवस असला तरी आजपासून खरी सुरुवात आहे. आजपासूनचा कठीण काळ सर्वांना सुखद जावो, अशीच इच्छा आहे असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले.'' 

''आई आणि मुलगा एकाच सभागृहात निवडून येण्याचे भाग्य लाभले. बाजूच्या हॉटेलमध्ये बसून महापौर होण्याचे स्वप्न पाहिले, ते पूर्णही झाले. सायकलवर फिरणाऱ्या कार्यकर्त्याला त्याच रस्त्यावरून महापौर म्हणून लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याची संधी मिळाली. सत्ताकेंद्र कोणतेही असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे आपले कर्तव्य असते. मी मी म्हणणाऱ्यांना लोक अद्दल घडवतात. आपल्यातील काही जण परत निवडून येतील, काहींना परतीचा नारळ मिळेल असे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी सांगितले.  

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी