शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक

By नितीन चौधरी | Updated: April 5, 2025 16:20 IST

विभागाला मार्चअखेर पाणीपट्टीपोटी ४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे

पुणे :पाणीपट्टी भरा, अन्यथा पाणीकपात करू, असा इशारा जलसंपदा विभागाने दिल्यानंतर महापालिकेने नमती भूमिका घेत २०० कोटी रुपयांची थकबाकी जमा केली. जलसंपदा विभागाची महापालिकेकडे ७१४ कोटी रुपयांची थकबाकी असून, महापालिकेकडे अजूनही ५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, विभागाला मार्चअखेर पाणीपट्टीपोटी ४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या आठ वर्षांमधील हा सर्वाधिक महसूल असल्याचे खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी संचालक श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले.महापालिकेकडे जलसंपदा विभागाची सुमारे ७१४ कोटी रुपयांची पाणीपट्टीसह दंडाची थकबाकी होती. थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाने दोनदा महापालिकेला स्मरणपत्र पाठविले होते. त्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीसुद्धा पाणीपट्टी भरा, अन्यथा कपात करावी लागेल, असा इशारा दिला होता. याच बैठकीत अखेर महापालिका आयुक्तांनी काही रक्कम भरण्याची तयारी दाखविली होती. त्यानुसार पुणे महापालिकेने ७१४ कोटींपैकी २०० कोटी रुपयांची रक्कम भरली. अजूनही सुमारे पाचशे कोटींहून अधिक थकबाकी आहे. महापालिकेने दंडाची रक्कम भरण्याची तयारी दाखविली असल्याचे कुऱ्हाडे यांनी सांगितले.जलसंपदा विभागाच्या खडकवासला प्रकल्पांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी पाणी पुरविले. या पाणीपट्टीपोटी जलसंपदा विभागाने आतापर्यंत गेल्या आठ वर्षांतील विक्रमी वसुली केली आहे. सिंचनासह बिगरसिंचनासाठी पाणीपुरवठा केल्याने पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेसह अन्य विभागांकडून ४२२ कोटी ४५ लाख ६७ हजार रुपयांची वसुली झाली. यात बिगरसिंचनासाठी ४१८ कोटी ३८ लाख रुपयांची वसुली (११५ टक्के) केली आहे. सिंचनाला केलेल्या पाणीपुरवठ्याद्वारे ४ कोटी ९ लाख म्हणजेच १०९ टक्के वसुली केली. सिंचनासाठी ३ कोटी ७५ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत ४ कोटी ७ लाख सहा हजारांची वसुली झाली. तसेच बिगरसिंचनासाठी ३६२ कोटी ३९ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना ४१८ कोटी ३८ लाख ६१ हजार रुपयांची वसुली झाली आहे.मुठा विभागांतर्गत सिंचनासाठी ५२ कोटींचे उद्दिष्ट असताना ५२ कोटी ५१ लाख रुपये वसूल करण्यात आले. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वसुली ठरली आहे. बिगरसिचंनासाठी २४४ कोटी ५१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक वसुली ही पुणे महापालिकेकडून करण्यात आली आहे. बिगरसिंचन विभागात पाणीपट्टी वसुलीत पुणे शाखा अव्वल स्थानी ठरली आहे. पवना उपविभागाचे सिंचनाचे उद्दिष्ट ६५ लाख होते. त्या विभागाकडून सुमारे ९१ कोटींची वसुली करण्यात आली. १३९ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले. गेल्या पाच वर्षांमध्ये ही वसुली सर्वाधिक ठरली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा ६५ कोटी रुपयांची पाणीपट्टी भरली आहे. पाणीपट्टी (रक्कम कोटींत)वर्ष........................ सिंचन............ बिगरसिंचन ........ एकूण३१ मार्च २०२२ ..........३१२.०३................१५८७८.८२............१६१९०.८५३१ मार्च २०२३ .........३१४.७३............२२३९३.८२..............२२७०८.५५३१ मार्च २०२४ .............३४१.८३...............३३४६५..........३३८०६.८३३१ मार्च २०२५................४०७.०६............४१८३८.६१............४२२४५.६७

पाणी कपातीचा इशारा आणि थकबाकी भरण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने २०० कोटींची रक्कम भरली आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ४२२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली ही सर्वाधिक ठरली आहे.-श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपातMuncipal Corporationनगर पालिका