शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

पुणे महापालिकेकडून १६ बड्या खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ‘नियंत्रित’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 20:58 IST

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चाललेली असल्यामुळे भविष्यात आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची भासणार आवश्यकता

ठळक मुद्देकोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता महापालिका आणि जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना कोरोना तसेच अन्य सर्व प्रकारच्या रुग्णांवरील उपचारांसाठी राज्य शासनाने अधिसूचना

पुणे : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चाललेली असल्यामुळे पालिकेला भविष्यात आयसीयू आणि व्हेंटीलेटर्सची आवश्यकता भासणार आहे. पालिकेकडून खासगी रुग्णालयांसोबत करारनामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत दहा रुग्णालयांसोबत पालिकेने करारनामे केले आहेत. तब्बल सोळा बड्या रुग्णालयांना पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दणका दिला आहे. या रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा नियंत्रित करण्याचे आदेशच आयुक्त गायकवाड यांनी बुधवारी संध्याकाळी काढले.

शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता महापालिका आणि जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना तसेच अन्य सर्व प्रकारच्या रुग्णांवरील उपचारांसाठी राज्य शासनाने अधिसूचना काढली होती. त्यानुसार पालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना आदेश दिले होते. लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेला आहे. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण आणि अतिगंभीर रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरुन शासनाने यापुर्वीच ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याबाबत आदेश दिलेले आहेत. भविष्यात पालिकेला आयसीयू आणि व्हेंटीलेटर्सची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर पडणार आहे.

पालिका आयुक्तांनी अधिकारांचा वापर करीत सोळा खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. यातील ५० टक्के खाटा या कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत. शासनाने निश्चित करुन दिलेल्या दरांनुसार या खाटांचे बिल आकारावे अशा सूचना करण्यात आल्या असून उपचारांचे बिल पालिका देणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. उपचारांचा खर्च संबंधित रुग्णालाच करावा लागणार आहे.=====पालिकेने यापुर्वी दहा रुग्णालयांसोबत करारनामे करुन कोरोनाग्रस्त रु ग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करुन घेतली आहे. भविष्यात आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासणार आहे. काही खासगी रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित करणे आवश्यक होते. शहरातील सोळा रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित करण्यात आल्या असून आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला जाईल. खाटा नियंत्रित केल्या याचा अर्थ त्या ताब्यात घेतल्या असे नाही किंवा राखीव ठेवल्या असेही नाही.- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महानगरपालिका======कोणती आहेत रुग्णालयेरुबी हॉल क्लिनिक, जहांगिर रुग्णालय, रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल, सह्याद्री रुग्णालय येरवडा, रत्ना हॉस्पिटल, देवयानी हॉस्पिटल, शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल, संजीवन हॉस्पिटल, ज्यूपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, कोलंबिया आशिया हॉस्पिटल खराडी, श्री क्रिटिकेअर अ‍ॅन्ड ट्रॉमा सेंटर हॉस्पिटल, विलू पुनावाला हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल औंध, इनामदार हॉस्पिटल=======रुग्णालयातील खाटांचा तपशीलएकूण खाटा ३०३४ऑपरेशनल बेड्स २२३७रेग्यूलेटेड बेड्स १७८६ऑक्सिजन बेड्स ९२९आयसीयू बेड्स १८९व्हेंटिलेटर बेड्स ८५

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल