पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय १३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी २२ कोटींच्या खर्चाला मंजूरी    

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 09:11 PM2019-09-09T21:11:57+5:302019-09-09T21:12:06+5:30

सुरक्षारक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे करारावर बहुउद्देशीय कर्मचारी नियुक्त केले जात आहेत.

Pune Municipal Corporation approves expenditure of Rs 22 crore for multipurpose 1350 contract employees | पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय १३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी २२ कोटींच्या खर्चाला मंजूरी    

पुणे महापालिकेच्या बहुउद्देशीय १३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी २२ कोटींच्या खर्चाला मंजूरी    

googlenewsNext
ठळक मुद्देठेकापध्दतीने वाहनचालक घेण्यासाठी  १५ कोटीचा खर्च

पुणे : महापालिकेच्या विविध मालमत्तांची देखभाल व इतर कामांमध्ये मदत करण्यासाठी १ हजार ३५० बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यास सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. सैनिक इंटेलिजन्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २२ कोटी ७ लाख २१ हजार रुपयांना हे काम देण्यात आले आहे.  
    सुरक्षा विभाग विविध प्रभाग कार्यालये, उद्याने, स्मशानभूमी, रुग्णालये, जलतरण तलाव, सांस्कृतिक केंद्रे, सामाजिक मंदिरे, प्राणी संग्रहालये, मनपाने व्यापलेल्या मालमत्ता, पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या टाक्यांसाठी जबाबदार आहेत. या सर्व ठिकाणी, सुरक्षा ही पालिकेच्या सुरक्षा विभागाची जबाबदारी आहे. पालिकेच्या या सर्व विभागांमध्ये ६६६ सुरक्षारक्षकांची आवश्यकता असते. सद्यस्थितीत स्थायी स्वरूपात कर्मचार्-यांची संख्या ३९४ आहे.  त्यापैकी २४९ पदे रिक्त आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे करारावर बहुउद्देशीय कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविली होती. त्यात सैनिक इंटेलिजन्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी प्रा. लि यांची निविदा सर्वात कमी दराची आली. त्यांच्याकडुन प्रति महा १३ हजार ६२४ या दराप्रमाणे १हजार ३५० कामगार पुरविण्यात येणार आहे. १२ महिन्यासाठी हा करार असणार आहे. राज्यसरकारकडुन किमान वेतन दर आणि विशेष भत्यामध्ये वेळोवेळी होणारया वाढीसह संबंधीताना बिले देण्यात येणार आहेत.
-----------------------
ठेकापध्दतीने वाहनचालक घेण्यासाठी  १५ कोटीचा खर्च
महापालिकेतील कचरा वाहने चालविण्यासाठी ठेका पध्दतीने वाहनचालक सेवक पुरविणे या कामासाठी प्रशासनाने निविदा मागविली होती. त्यात श्री एंटरप्रायजेस यांची सर्वात कमी दराची  म्हणजे  १४ कोटी ९५ लाख ३३ हजार ९३०रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. राज्यसरकारकडुन किमान वेतन दर आणि विशेष भत्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या वाढीसह संबंधीताना बिले देण्यात येणार आहेत.

Web Title: Pune Municipal Corporation approves expenditure of Rs 22 crore for multipurpose 1350 contract employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.