शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पुणे महापालिकेचे बालगंधर्व पुरस्कार जाहीर ;2020 चा पुरस्कार निर्मलाताई गोगटे यांना तर २०२१ चा पुरस्कार रेवा नातू यांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 20:42 IST

आज समितीची बैठक घेऊन घोषणा

पुणे महापालिकेचे बालगंधर्व पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. सन २०२० चा बालगंधर्व मुख्य पुरस्कार नाट्य आणि संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री श्रीमती निर्मलाताई गोगटे यांना जाहीर झाला आहे. तर मुख्य पुरस्काराबरोबरच चित्रपट व नाटय क्षेत्रातील लेखन व दिग्दर्शनासाठी श्री. किरण यज्ञोपवित नाटय व्यवस्थापनासाठी प्रवीण बर्वे,रंगमंच व्यवस्थापनासाठी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून श्री. संदीप देशमुख, संगीत रंगभूमीवरील योगदानासाठी ज्येष्ठ कलाकार श्री. रविंद्र कुलकर्णी आणि बालगंधर्वांचा ठेवा जतन करुन, विविध नाटयसंम्मेलनात प्रदर्शन भरवून, त्यांची आठवण नवीन पिढीला करुन देण्यासाठी 'सौ. अनुराधा राजहंस यांचाही सन्मान होणार आहे.

 २०२१ चा बालगंधर्व मुख्य पुरस्कार शास्त्रीय संगीत गायन क्षेत्रात भरीव योगदान देणार्यास गायिका डॉ. रेवा नातू यांना जाहीर झालेला आहे. मुख्य पुरस्काराबरोबरच व्हायोलिन क्षेत्रातील शिक्षिका व कलाकार श्रीमती रमा चोभे, नाटय क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी श्री. समीर हंपी, बहुआयामी नाटयकर्मी श्री. प्रसाद वनारसे, बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून श्री. गणेश माळवदकर, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजनाकार तसेच बॉक्स थिएटरच्या निर्मितीसाठी श्री. प्रविण वैद्य यांची इतर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.पुणे महानगरपालिकेतर्फे प्रतिवर्षी बालगंधर्व पुरस्कार देण्यात येतो. परंतु सन २०२० मधील कोरोना महामारीच्या संकटामुळे बालगंधर्व पुरस्काराचे वितरण होवू शकले नाही. २६ जून रोजी बालगंधर्वांची जयंती साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून सन २०२० व सन २०२१ च्या बालगंधर्व पुरस्कारांची घोषणा आज मा. महापौर यांनी केली.

 यासाठी पदाधिकारी व पक्षनेते तसेच निवड समितीची बैठक आज बुधवार, दि. २३ जून २०२१ रोजी महापौर कार्यालय येथे पार पडली. सदर बैठकीस मुरलीधर मोहोळ महापौर यांचे समवेत, सुनिता वाडेकर, उपमहापौर ,मा. हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, सौ. दिपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या, उल्हास उर्फ आबा बागुल, पक्षनेते, काँग्रेस, मा. पृथ्वीराज शशिकांत सुतार, पक्षनेते, शिवसेना, साईनाथ बाबर, पक्षनेते, मनसे, सौ. फरजाना अय्युब शेख, पक्षनेते, आर.पी.आय,सौ. माधुरी सह्रबुद्धे, नगरसेविका यांच्या समवेत मा.उल्हासदादा पवार, माजी आमदार, सौ.अनुराधा राजहंस, श्री. डॉ.सतिश देसाई, माजी उपमहापौर, सौ. शुभांगी दामले,श्री. उस्ताद फैय्याज हुसैन खान आदी निवड समिती सदस्य उपस्थित होते.         

  १५ जुलै रोजी बालगंधर्व यांची पुण्यतिथी असते. पुढील काळात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन बालगंधर्व पुरस्काराचा वितरण सोहळा गुरुवार, दि. १५ जुलै २०२१ रोजी आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे आहे असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcultureसांस्कृतिक