शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर; सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 14:49 IST

पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त पुणे महापालिका (सिंहगड रोड क्षत्रिय कार्यालय) संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले

पुणे: पुण्यातील सिंहगड रोड भागात एकता नगरी, निंबजनगरी, विठ्ठलवाडी परिसरात  खडकवासला धरणातील विसर्गामुळे घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे सामान्यांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. प्रशासनाच्या मदतकार्याने नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला. महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत सिंहगड रस्ता क्षेत्रीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त पुणे महापालिका (सिंहगड रोड क्षत्रिय कार्यालय) संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे.  

पुण्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्ता भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा पालकमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. नागरिकांचे हाल होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा असे आदेश देखील दिले होते. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचे आदेश दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले आहेत. या पूर परिस्थितीमध्ये कर्तव्यात कसुरी करणाऱ्या अधिकाऱ्याला महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी निलंबित केले. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस