पुणे-मुंबई एक्स्प्रेस देहूरोडला थांबणार

By Admin | Updated: May 12, 2014 02:44 IST2014-05-12T02:44:00+5:302014-05-12T02:44:00+5:30

सिंहगड एक्स्प्रेस देहूरोड स्थानकात मुंबईला जाताना थांबवावी बसप पक्षाचे जिल्हा सचिव तंतरपाळे यांनी दिली.

Pune-Mumbai Express will halt at Dehuroad | पुणे-मुंबई एक्स्प्रेस देहूरोडला थांबणार

पुणे-मुंबई एक्स्प्रेस देहूरोडला थांबणार

देहूरोड : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस देहूरोड स्थानकात मुंबईला जाताना-येताना थांबवावी, शहर बसपने देहूरोड रेल्वे स्टेशनला धम्मभूमी देहूरोड असे नाव द्यावे, यांसह केलेल्या अन्य मागण्या रेल्वे प्रशासनाने मान्य केल्या आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हा सचिव धर्मपाल तंतरपाळे यांनी दिली. तंतरपाळे म्हणाले, ‘‘बाजारपेठ ते पोस्ट आॅफिस ब्रिज करावा, या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा, तसेच स्टेशनचे नामांतर, स्थानिक प्रशासनाचा ठराव आल्यावर करू, असे लेखी आश्वासन पुण्याचे मंडल रेल प्रबंधक सुनीत शर्मा यांनी बसपच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती तंतरपाळे यांनी दिले. या वेळी हनुमंत राऊत, बाबूराव भालेराव, अशोक कांबळे, राम मनोहरे उपस्थित होते.

Web Title: Pune-Mumbai Express will halt at Dehuroad