शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे : अतिवेगाला आवर घातल्याने घटले अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:44 IST

तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे.

- हणमंत पाटील/ विशाल विकारी लोणावळा (पुणे) : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचेप्रमाण घटले आहे. तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे.पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामागावर अपघाताचे प्रमाण वाढल्याने वेगाला आवर घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. तसेच अपघातांची ठिकाणे शोधून उपाययोजना केल्या होत्या. त्याचा परिणाम गेल्या तीन वर्षांत अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.४७ हजार वाहनांवर कारवाईवाहतुकीचे नियम मोडत वेगाने वाहने चालविणे, लेन कटिंग असे प्रकार करणाºया तब्बल ४७ हजार ४९३ वाहनांवर दोन वर्षांत खंडाळा महामार्ग पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून ६२ लाख ८० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. २०१८ मध्ये द्रुतगती मार्गावर अमृतांजन पूल ते मळवली बोरजदरम्यान ५१ अपघात झाले होते. २०१९ मध्ये ही संख्या घटून ३२ झाली आहे. तर मागील दोन महिन्यांत केवळ एक अपघात झाला आहे.वेगावर नियंत्रण महत्त्वाचेसततची पेट्रोलिंग, वेगमर्यादा व लेन कटिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे.वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास व लेन कटिंगचा मोह टाळल्यास अपघातांचे प्रमाण निश्चित मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे खंडाळा महामार्गाचे सहायकपोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांनी सांगितले.द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी करण्यासंदर्भात २०१८ पासून उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू केल्याने वाहनांची वेग मर्यादा ताशी शंभरवर आणण्यात यश आले आहे. त्यामुळे भरधाव वेगामुळे अपघात कमी झाले आहे.-मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा 

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेAccidentअपघात