शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : मोटार परवाना बंधनकारक, अन्यथा घरचा रस्ता : तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 05:31 IST

कायद्यानुसार आगारप्रमुखांसह कार्यशाळेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचा-यांकडे परवाना असणे आवश्यक आहे. बसची कामे करताना बस चालविण्याची माहिती असणे आवश्यकच आहे. त्याशिवाय बसमधील तांत्रिक बिघाड संबंधित अधिका-यांना समजणारच नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हा परवाना नाही, त्या सर्वांना काही दिवसांपूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हा परवाना बंधनकारक करण्यात आला आहे; अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल.

पुणे : मोटार वाहतूक कामगार कायद्यातील तरतुदीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)तील अनेक अधिकारी व तांत्रिक विभागातील कर्मचा-यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांना परवाना मिळविण्याची नोटीस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बजावली आहे.पीएमटी व पीसीएमटीच्या एकत्रीकरणातून २००७ पीएमपी या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. मात्र, मागील दहा वर्षांत कंपनीची वाटचाल कंपनीची रचना, विविध वाहतूकविषयक कायदे याप्रमाणे क्वचितच पाहायला मिळाली. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नियमांवर बोट ठेवत कामाला सुरुवात केली.प्रत्येक कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी कामाची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यातून भोंगळ कारभाराची प्रचिती आली. मोटार वाहतूक कामगार कायद्याचेही उल्लंघन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.या कायद्यानुसार ‘पीएमपी’ मधील आगार व्यवस्थापक, आगार अभियंते तसेच तांत्रिक विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे; मात्र ‘पीएमपी’मध्ये बहुतेकांकडे हा परवाना नाही. त्याअनुषंगाने परवाना नसलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.आगार व्यवस्थापक, आगार अभियंते, सहायक अभियंते, मेकॅनिक, टाइमकीपर, इतर तांत्रिक कर्मचाºयांचा त्यामध्ये समावेश आहे. बसच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये या सर्वांचा थेट संबंध येत असतो. त्याची केवळ तांत्रिक माहिती असून उपयोग होत नाही. ही बस चालविता येणेही अपेक्षित आहे.त्याशिवाय त्यातील तांत्रिक बाबी पूर्णपणे कळणार नाही. तसेच, मार्गावर बस चालविताना चालकांना येणारे अडथळे, त्यासाठी घ्यावयाची काळजी, तांत्रिक बिघाड, ब्रेक, क्लचचा वापर या सर्व बाबींची माहिती संबंधितांना हवी. त्यासाठी जड वाहन चालविण्याचा परवाना मिळविणे संबंधितांना बंधनकारक करण्यात आले आहे.

कायद्यानुसार आगारप्रमुखांसह कार्यशाळेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचा-यांकडे परवाना असणे आवश्यक आहे. बसची कामे करताना बस चालविण्याची माहिती असणे आवश्यकच आहे. त्याशिवाय बसमधील तांत्रिक बिघाड संबंधित अधिका-यांना समजणारच नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हा परवाना नाही, त्या सर्वांना काही दिवसांपूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हा परवाना बंधनकारक करण्यात आला आहे; अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल.- तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,पुणे महानगर परिवहन महामंडळ

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेPuneपुणेPMPMLपीएमपीएमएल