शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : नाताळसाठी एसटीच्या 50 जादा गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 08:12 IST

नाताळच्या सुटीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातून 50 जादा गाड्या सोडल्या आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट आणि वाकड-हिंजवडी येथून या विशेष गाड्या सुरू राहणार असल्याचे एसटीचे पुणे विभागीय वाहतूक नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

पुणे : नाताळच्या सुटीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातून ५० जादा गाड्या सोडल्या आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट आणि वाकड-हिंजवडी येथून या विशेष गाड्या सुरू राहणार असल्याचे एसटीचे पुणे विभागीय वाहतूक नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.नाताळनिमित्त काही शाळांना पाच ते दहा दिवस सुटी लागली आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस जोडून सुटी आल्याने अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले आहे. तसेच, पुणे शहर व परिसरात राहणा-या अनेक नागरिकांनी सहकुटुंब बाहेरगावी सुटीचा आनंद लुटण्यासाठी काही दिवस आधीच एसटीचे बुकिंग करून ठेवले आहे. पुण्याबाहेर जाणा-यांची संख्या मोठी असून पुण्यात येणाºयांची संख्या तेवढीच आहे. त्यामुळे शहराला जोडणाºया महामार्गावर कमीअधिक प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागीय एसटी महामंडळाने शहरातून ५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. शिवाजीनगर येथून पणजीसाठी ३ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच, वाहतूककोंडी होत असल्याने काही गाड्या नियोजित वेळेत निश्चित ठिकाणी पोहोचत नसल्याचे एसटीच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.एसटीचे विभागीय वाहतूक नियंत्रक श्रीनिवास जोशी म्हणाले, ‘‘शिवाजीनरग बस स्थानकावरून २२ जादा गाड्या सोडल्या आहेत. तर, स्वारगेट येथून कोल्हापूर, सातारा, मुंबई, ठाणे येथे जाणा-या गाड्या सोडल्या जात आहेत. वाकड-हिंजवडी येथे शुक्रवारी १० रिकाम्या गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. त्या विविध मार्गांवर धावणार आहेत. त्याचप्रमाणे सुटीच्या कालावधीत १७ शिवशाही बस सोडल्या जाणार असून, त्याबाबतचे नियोजन केले जात आहे.’’तिकिटासाठी रांगाच रांगाशिवाजीनगर व स्वारगेट या बस स्थानकांवर शनिवारी दुपारनंतर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांनी बस स्थानकावर मोठ्या रांगा लावल्या होत्या. या रांगा स्थानकापासून रस्त्यापर्यंत बाहेर आल्या होत्या. पुणे विभागाकडून अधिक गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, स्थानकातून सोडण्यात आलेल्या गाड्यांच्या तुलनेत प्रवाशांची संख्या अधिक असल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.

टॅग्स :Puneपुणेstate transportराज्य परीवहन महामंडळ