पुणे : इंडिगो एअरलाईन्स या विमान कंपनीच्या गोंधळामुळे नागपूरला जाणारी अनेक विमाने रद्द झाली आहेत. त्याचा पुण्यातील आमदारांना फटका बसला असून, अनेक आमदार खासगी वाहनाने हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला जाणार आहेत.
राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर सुरू होणार आहे. या अधिवेशानासाठी नागपूरला जाण्यासाठी आमदार विमान प्रवास निवडतात. मात्र यंदा ‘इंडिगो’मुळे झालेल्या गोंधळाने अनेक आमदारांचे विमान प्रवास रद्द झाले आहेत.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या एअर इंडियाच्या विमानाने नागपूरमध्ये पोहचल्या आहेत. पुणे ते नागपूर हे अंतर ७०० किलोमीटरचे आहे. त्यासाठी १२ तासांचा वेळ लागत आहे. कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे एकाच चार्टर्ड विमानाने नागपूरला जाणार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, हडपसरचे आमदार चेतन तुपे , खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर, वडगावशेरीचे आमदार बापू पठारे, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे हे खासगी वाहनाने नागपूरला जाणार आहेत.
Web Summary : Indigo flight cancellations disrupt Pune MLAs' travel plans for the Nagpur winter session. Some, including ministers, will use chartered planes, while others are resorting to private vehicles for the 700 km journey.
Web Summary : इंडिगो की उड़ानें रद्द होने से नागपुर शीतकालीन सत्र के लिए पुणे के विधायकों की यात्रा योजना बाधित हुई। कुछ मंत्री चार्टर्ड विमानों का उपयोग करेंगे, जबकि अन्य 700 किलोमीटर की यात्रा के लिए निजी वाहनों का सहारा ले रहे हैं।