शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Mini Lockdwon : संचारबंदीचा पुणेकरांनी घेतला धसका; मार्केटयार्डमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:06 IST

Mini Lockdown : एकीकडे कोरोना रोखण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत असताना दुसरीकडे नागरिक खरेदीसाठी तोबा गर्दी करत आहे.

पुणे : पुण्यात आजपासून 'मिनी लॉकडाऊन'जाहिर करण्यात आला आहे. दुकानांना वेळा सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र, एकीकडे कोरोना रोखण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत असताना नागरिकांकडून तोबा गर्दी केली जात असल्याचे चित्र मार्केटयार्ड परिसरात शनिवारी पाहायला मिळाले आहे.

पुण्यात उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पुण्यात कडक निर्बंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्बंधांची आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.त्याच धर्तीवर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पुणेकरांनी थेट मार्केटयार्ड गाठले.  मात्र याचदरम्यान नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे जाणवत होते. कारण किराणा भुसार बाजारात तोबा गर्दी जमा झाली होती.

खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी अस्ताव्यस्त पार्किंग केल्यामुळे काहीवेळ या भागात वाहतुककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती.  

तसेच शहरातील किराणा दुकानांमध्ये देखील संचारबंदीमुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली असल्याचे निदर्शनास आले. कर्वेनगर, कोथरुड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता,प्रमुख पेठांमध्ये, मंडई परिसरात देखील पुणेकरांची खरेदीसाठी एकच झुंबड उडालेली दिसली. जीवनावश्यक खरेदीसाठी येथे नागरिकांना तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत आहे. 

नागरिकांसह व्यापाऱ्यांनी सुद्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर वापर देखील गरजेचा आहे......

नेहमीपेक्षा गर्दी जास्त...पण सर्वतोपरी काळजी घेतोय...शहरातील छोट्या छोट्या दुकानदार नागरिकांनी संचारबंदी, लॉकडाऊनचा चांगलाच धसका घेतलेला दिसतो आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा आज जास्त गर्दी आहे. बहुतेक आगामी काळात मालाचा तुटवडा जाणवू नये,म्हणून माल भरून ठेवण्याचे सर्वांचेच नियोजन आहे. परंतु आम्ही गर्दी केली असली तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे कठोर पालन करण्याबाबत आम्ही आग्रही आहोत.प्रवीण चोरबोले, मार्केटयार्ड

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMarket Yardमार्केट यार्डcommissionerआयुक्त