शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pune MHADA Lottery 2025 Result: म्हाडा लॉटरीचा निकाल जाहीर; घरबसल्या अशी पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:29 IST

Pune MHADA Lottery Result 2025 Winners List: म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या हजारो अर्जदारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विविध तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे रखडलेली ४,१८६ घरांची सोडत आज (मंगळवार, १० फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता जाहीर करण्यात आली.

Pune MHADA Lottery Result 2025 Winners List: म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या हजारो अर्जदारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विविध तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे रखडलेली ४,१८६ घरांची सोडत आज (मंगळवार, १० फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता जाहीर करण्यात आली. या सोडतीसाठी तब्बल दोन लाख १५ हजारांहून अधिक अर्जदार नशीब अजमावत असून काही तासांतच ४,१८६ नशीबवान विजेत्यांची नावे स्पष्ट होतील.

पुणे मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२ वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात हा सोडतीचा कार्यक्रम सुरू झाला. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. तर, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. पुणे मंडळाने २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ३,३२२ घरे आणि १५ टक्के एकात्मिक योजनेंतर्गत ८६४ घरे उपलब्ध करून दिली आहेत. या एकूण ४,१८६ घरांसाठी सुमारे २ लाख १५ हजार अर्जदारांनी अनामत रक्कम जमा करून सहभाग नोंदवला आहे.

या घरांची जाहिरात सप्टेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक बिघाड, अर्जांची छाननी करण्यास झालेला विलंब आणि त्यानंतर लागलेली जिल्हा परिषदेची आचारसंहिता यामुळे ही सोडत वारंवार लांबणीवर पडली. यामुळे संतप्त झालेल्या अर्जदारांनी मोर्चाही काढला होता. अखेर आचारसंहिता संपताच १० फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.

पुणे म्हाडा निकाल कुठे आणि कसा पाहायचा?

लाईव्ह प्रेक्षपण: घराबाहेरून निकाल पाहण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत यूट्यूबवर भेट द्या किंवा इथे पहा लाईव्ह 

वेबसाइट: सोडतीनंतर काही तासांनी https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर विजेत्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

मोबाईल: ज्यांची लॉटरी लागली आहे, अशा विजेत्यांना काही मिनिटांतच त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे निकाल कळवला जाईल.

थेट उपस्थिती: अर्जदार स्वतः कार्यक्रमस्थळी जाऊनही निकाल पाहू शकतात.

 

पुणे म्हाडाच्या विजेत्यांची यादी कशी पाहाल? How to Check Pune MHADA Lottery Winners List 2025

१. सर्वात आधी म्हाडाच्या अधिकृत पोर्टलवर mhada.gov.in/mr जा.

२. 'Quick Links' शोधा: मुख्यपृष्ठावर (Homepage) तुम्हाला 'Quick Links' हा विभाग दिसेल, त्यावर क्लिक करा.

३. तिथे तुम्हाला "पुणे मंडळ गृहनिर्माण सोडत २०२५ दिनांक १०-०२-२०२६ रोजीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा" अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

४. निकाल फाइल डाउनलोड करा: येथे तुम्हाला विजेत्यांची (Winners List) आणि प्रतीक्षा यादी (Waitlist) अशा PDF फाइल्स दिसतील. तुमच्या योजनेनुसार फाइल डाउनलोड करा.

५. नाव तपासा: PDF मध्ये Ctrl + F वापरून तुमचा अर्ज क्रमांक किंवा नाव शोधून तुम्ही निकाल पाहू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA Lottery Results Out Today; Check Winners List Online!

Web Summary : MHADA Pune lottery results for 4,186 homes announced today. Over two lakh applicants participated. Winners will be notified via SMS and the list is available on the MHADA website.
टॅग्स :mhadaम्हाडा लॉटरीPuneपुणेResult Dayपरिणाम दिवसHomeसुंदर गृहनियोजनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड