शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या घोषणेचे पुणे मेट्रोकडून स्वागत ; यावर्षी ७०० कोटींची अपेक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 20:25 IST

पुणे मेट्रोचे काम आम्ही वेगात व कार्यक्षमतेने करीत असल्याचेच यातून सिद्ध

ठळक मुद्देपुणे मेट्रोचा एकूण प्रकल्प ११ हजार ४२० कोटी रुपयांचा : आतापर्यंत मिळाले ६९० कोटी

पुणे : राज्य सरकारनेपुणेमेट्रोला मागील ५ वर्षांपेक्षा यावर्षी जास्त आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केल्यावर महामेट्रो कंपनीकडून त्याचे स्वागत करण्यात आले. पुणे मेट्रोचे काम आम्ही वेगात व कार्यक्षमतेने करीत असल्याचेच यातून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया यावर महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.  दीक्षित म्हणाले, ‘‘राज्य सरकार सुरुवातीपासून या प्रकल्पाच्या मागे आहे. पुणे मेट्रोचे काम सुरुवातीला मागे पडले, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते अधिक वेगाने होत आहे. लवकरच वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ते दापोडी हे दोन मार्ग सुरू होतील. कामाचा वेग वाढल्याने आता निधीची गरज होती. आतापर्यंत आम्हाला राज्य सरकारकडून ६९० कोटी रुपये मिळाले आहेत. या आर्थिक वर्षात आम्हाला राज्य सरकारकडून ७०० कोटी रुपयांची अपेक्षा आहे. तो निधी मिळेल, याची खात्री राज्य सरकारने यंदाच्या अंदाजपत्रकातू दिली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे.’’पुणे मेट्रोचा एकूण प्रकल्प ११ हजार ४२० कोटी रुपयांचा आहे. प्रकल्पाचा निम्मा निधी परदेशी वित्तीय कंपन्यांकडून अल्प व्याजदराने कर्ज घेऊन उभारण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारने या कर्जाची हमी घेतली आहे. उर्वरित खर्च केंद्र सरकार, राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे महापालिका यांच्यात विभागून करण्यात येत आहे. मागील तीन वर्षांपासून पुण्यात मेट्रोचे काम सुरू झाले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात काम सुरू करतानाची रक्कम म्हणून एकूण ६०० कोटी रुपये गुंतवण्यात आले. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात केंद्र सरकार व वित्तीय कंपन्या यांचे मिळून २००३ कोटी रुपये प्रकल्पात आले. राज्य सरकारने मात्र यंदा फक्त २४४ कोटी ७७ लाख रुपये दिले आहेत.पुणे महापालिकेचा या प्रकल्पातील आर्थिक हिस्सा जागांच्या मोबदल्यात दिला जात आहे. मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने कोथरूड येथील कचरा डेपोची, तसेच स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागाची बरीच मोठी जागा दिली आहे. त्यासाठीचे आर्थिक मूल्यमापन किती केले आहे, त्याची माहिती मिळू शकली नाही, मात्र याच पद्धतीने पुणे महापालिका त्यांचा हिस्सा अदा करणार असल्याची माहिती मिळाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबतही तसेच धोरण असल्याचे समजते.  

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोState Governmentराज्य सरकार