शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मेट्रो स्टेशन 'रामभरोसे'!काही अपघात झाला तर जबाबदार कोण? जनतेचा प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:19 IST

- रामवाडी, कल्याणीनगर व येरवडा मेट्रो स्टेशनची पाहणी : कोणालाही सहज मिळतो प्रवेश; काही अपघात झाला, तर जबाबदार कोण? जनतेचा प्रश्न   पीएमपी, एसटी, रेल्वे, मेट्रो स्थानकांबाहेर सुरक्षा वाऱ्यावर लाखो प्रवाशांची वर्दळ असूनही केवळ आतील भागात सीसीटीव्ही; बाहेरील परिसरात मोकळे रान

- अंबादास गवंडीपुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या कणा असलेल्या पीएमपी, एसटी, रेल्वे मेट्रो स्थानकांबाहेर कायम प्रवाशांची गर्दी असते. दरराेज लाखो प्रवासी यातून प्रवास करतात. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक याची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, राजधानी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाॅम्बस्फोटामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त राज्य आणि राज्याबाहेरील लाखो नागरिक राहतात. यामुळे पीएमपी, एसटी, मेट्रो, रेल्वेतून लाखो नागरिक प्रवास करतात. यामुळे बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक परिसरात, मेट्रो स्थानकाबाहेर, शिवाय डेक्कन, कात्रज, हडपसर, शिवाजीनगर या ठिकाणी असणाऱ्या पीएमपी स्थानकांत सीसीटीव्ही यंत्रणांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही अघटित दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी स्थानक परिसरातील आतील भागासह बाहेरील परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक :

स्वारगेट बलात्कार प्रकारणानंतर स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील आतील भागात सीसीटीव्ही बसण्यात आले परंतु बाहेरील भागात अद्याप सीसीटीव्ही बसवले नाहीत. त्यामुळे गर्दीच्या वेळी स्थानकाच्या बाहेरील भागात काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी बाहेरील परिसरात सीसीटीव्ही लावणे, सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आगारांतून दिवसरात्र एसटी सेवा सुरू असते. त्यामुळे बसस्थानकांत कायम प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पीएमपी बसस्थानक आणि थांबा  पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून दररोज १० लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. परंतु डेक्कन, कात्रज, हडपसर, स्वारगेट, शिवाजीनगर व मध्यवर्ती भागात प्रवाशांची वर्दळ असूनही पीएमपी डेपो आणि प्रमुख बसथांब्यांवर सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. दरराेज दहा लाखांहून अधिक प्रवासी असूनदेखील प्रवाशांच्या सुरक्षेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. शिवाय अनेक पीएमपी स्थानकांत गर्दुल्यांचा खुलेआम वावर असतो. त्यामुळे महिला, ज्येष्ठांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.

 पुणे रेल्वे स्टेशन :

पुणे स्थानकावरून दररोज दीड ते दोन लाख नागरिक प्रवास करतात. त्यामुळे येथे कायम वर्दळ असते. रेल्वे स्थानकावरील आतील भागात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे परंतु बाहेरील बाजूस सीसीटीव्हींची संख्या कमी आहे. शिवाय आरपीएफकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे स्थानक परिसरात सुरक्षा यंत्रणा कमी पडत आहे. फलाटवर जागा कमी असल्याने व्हरांड्यात हजारो प्रवासी बसतात. शिवाय प्रवासी बॅग तपासणी यंत्रणा असूनदेखील ये-जा करण्यासाठी दरवाजे जास्त असल्याने अनेक ठिकाणांवरून प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे उपलब्ध सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरत आहे.मेट्रो स्टेशन :

महामेट्रोकडून मेट्रो स्टेशनवर प्रत्येक स्थानकांत सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. परंतु काही मेट्रोबाहेर सीसीटीव्ही उपलब्ध नाही. शहरातील अनेक मेट्रो स्थानक परिसरात प्रवासी खेचण्यासाठी रिक्षांची वर्दळ असते. यामुळे काही वेळा वाहतूककोंडीदेखील होते. स्वारगेट ते पीसीएमसी आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर मेट्रोला दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा वाढविण्यासाठी आवश्यक आहे. तसेच स्वारगेट, सिव्हिल कोर्ट या ठिकाणी प्रवाशांची गर्दी जास्त असते. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची आणखी संख्या वाढविणे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune's Metro Stations Lack Security: Who's Responsible for Accidents?

Web Summary : Pune's public transport hubs, including metro stations, face security gaps. CCTV and personnel shortages raise passenger safety concerns amid increasing traffic. Lack of security measures in key areas poses risk.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे