शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Mayor: पुण्याच्या ५८ व्या आणि १० व्या महिला महापौर मंजुषा नागपुरे; उपमहापौर परशुराम वाडेकर निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:46 IST

Pune Mayor अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची खूप इच्छा होती. परंतु ते आपल्यामध्ये आज नाहीत, याची मोठी उणीव जाणवत असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडुन मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही पदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार )आणि कॉग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी पुणे महापालिकेत भाजपची एकहात्ती सत्ता असल्यामुळे या निवडणुकीत नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे नागपुरे आणि वाडेकर यांच्या निवडीची केवळ औपचारीकता बाकी राहिली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपच्या चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तापकीर यांच्यासह मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरादा बापट यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. महापौर कोण होणार याची उत्सुकता लागली होती. महापौरपदासाठी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी मुळचे आरपीआयचे असलेले आणि भाजपच्या चिन्हावर निवडुन आलेले परशुराम वाडेकर यांच्या नावावर मंगळवारी सकाळी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर नागपुरे यांनी महापौर पदासाठीचा तर उपमहापौरपदासाठी वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, गटनेते गणेश बिडकर, माजी सभागृहनेते आणि नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

सिहंगड रोडला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार

महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थित होणार आहे. निवडणुकीच्या दिवशी पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देतात. त्यानंतर अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक प्रक्रिया राबवून सभागृहात मतदान होते. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणा झाल्यानंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार आहे. नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी अर्ज भरला आहे.

पत्नीपाठोपाठ पती उपमहापौर होणार

भाजपने उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना संधी दिली आहे. त्यांची निवड निश्चित होणार आहे. गेल्या टर्ममध्ये परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या. आता परशुराम वाडेकर हे उपमहापौर होणार आहेत. त्यामुळे पत्नी पाठोपाठ पती उपमहापौर होणार आहे.

वर्षा तापकीर यांच्यावर अन्याय

भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर या २००७, २०१२, २०१७ आणि आता निवडून आल्या आहेत. त्या सलग चौथ्यांदा सभागृहात आल्या आहेत. २०१७ मध्ये पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना वर्षा तापकीर यांना कुठल्याही पदावर संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता वर्षा तापकीर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता होती. पण या वेळेसही वर्षा तापकीर यांना डावलण्यात आले आहे. वर्षा तापकीर या सातत्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या भागातुन निवडून आल्या आहेत.

शहराच्या ५८व्या आणि दहाव्या महिला महापौर होणार

पुणे महापालिकेत आतापर्यंत ५७ महापौर तर कमल व्यवहारे ,ॲड. वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर ,दिप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, चंचला कोंद्रे , मुक्ता टिळक या नउ महिला महापौर झाल्या आहेत. मंजुषा नागपुरे यांची निवड झाल्यानंतर ५८व्या महापौर तर दहाव्या महिला महापौर ठरणार आहे.

महापौर पद हे केवळ उपभोगण्यासाठी नव्हे तर पुणेकरांची सेवा करण्यासाठी मिळालेली संधी आहे. त्यामुळे पुणेकरांना हेवा वाटेल त्याप्रमाणे काम करणार आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी विश्वास ठेवून महापौर पदाची मोठी संधी दिली आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची खूप इच्छा होती. परंतु ते आपल्यामध्ये आज नाहीत, याची मोठी उणीव जाणवत आहे. - मंजुषा नागपुरे, महापौर पदाच्या उमेदवार, भाजप.

English
हिंदी सारांश
Web Title : Manjusha Nagpure Elected Pune's Mayor; Parshuram Wadekar Deputy Mayor

Web Summary : Manjusha Nagpure of BJP is set to become Pune's next mayor. Parshuram Wadekar is to become the deputy mayor. BJP holds a majority in the Pune Municipal Corporation, ensuring their victory. Nagpure will be the 58th mayor and the tenth woman to hold the position.
टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWomenमहिलाPoliticsराजकारणMahayutiमहायुती