पुण्यात मास्क न वापरणे पडले १ हजार रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 02:14 AM2020-04-14T02:14:30+5:302020-04-14T02:14:43+5:30

महेश शांताराम धुमाळ (वय ३१, रा़ नाना पेठ) असे या वेल्डरचे नाव आहे़ ते बंदी आदेश मोडून मास्क न लावता विनाकारण फिरताना आढळून आले़

 In Pune, the mask cost about Rs 1 thousand to person | पुण्यात मास्क न वापरणे पडले १ हजार रुपयांना

पुण्यात मास्क न वापरणे पडले १ हजार रुपयांना

Next

पुणे : कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहून सरकारने मुंबई, पुणे शहरासह अनेक ठिकाणी घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक केले आहे़ परंतु हा आदेश न पाळणे एका वेल्डरला चांगलाच अंगाशी आला आहे़ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़

महेश शांताराम धुमाळ (वय ३१, रा़ नाना पेठ) असे या वेल्डरचे नाव आहे़ ते बंदी आदेश मोडून मास्क न लावता विनाकारण फिरताना आढळून आले़ त्यामुळे पोलीस हवालदार गणपतराव थिकोळे यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली़ त्यानुसार धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला़ न्यायालयाने त्यांना १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title:  In Pune, the mask cost about Rs 1 thousand to person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.