शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जाssदू... पुण्यात एकाला दिसला एलियन, पोलिसांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 09:34 IST

पुण्यातील एका व्यक्ती एलियन दिसल्याचा दावा करत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपुण्यातील एका व्यक्तीनं एलियन दिसल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाला तशा आशयाचा एक मेलही पाठवला आहे.इमेल पाठवणारा 47 वर्षीय व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचं तपासात आढळलं आहे.

पुणे- पुण्यातील एका व्यक्तीनं एलियन दिसल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाला तशा आशयाचा एक मेलही पाठवला आहे. त्या व्यक्तीनं पीएमओला पाठवलेल्या मेलनं पुणे पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी आता त्या व्यक्तीचा शोध घेतला असून, तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं समोर आलं आहे.सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पुण्यातील कोथरुडमध्ये वास्तव्याला असलेल्या एका व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाला एक इमेल पाठवला. त्याला स्वतःच्या घराच्या बाहेर एलियन दिसल्याचा दावा त्यानं इमेलमध्ये केला आहे. पंतप्रधान कार्यालयानं हा इमेल महाराष्ट्र सरकारला पाठवला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी पुणे पोलिसांकडे सोपवली आहे.पुणे पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला असून, इमेल पाठवणारा 47 वर्षीय व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचं तपासात आढळलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी त्या व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाला होता, त्यानंतर त्याचं मानसिक संतुलन ढासळलं. त्यानं घराबाहेर वीज पाहिली आणि त्याला ते एलियश असल्याचा भास झाला. विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं थेट पीएमओला मेल केला होता आणि त्याची कल्पना घरच्यांनाही दिली नाही. 

टॅग्स :Policeपोलिसkothrudकोथरूडprime ministerपंतप्रधान